Kia India ने लाँच केले Seltos चे 2 नवे व्हेरिएन्ट; मिळतात हे खास फीचर्स

टाइम्स मराठी । Kia India ने नवीन सेलट्रोस मॉडेल मध्ये २ नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे. या व्हेरीएंट चे नाव GTX + (S) आणि X-Line (S) असं आहे. यासोबतच किआ इंडिया 2025 पर्यंत नवीन इलेक्ट्रिक MPV लॉन्च करण्याची देखील योजना बनवत आहे. कंपनीने लॉन्च केलेले दोन व्हेरिएंट स्टाइलिश डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय या नव्या व्हेरिएन्टमध्ये ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम देखील यामध्ये देण्यात आली आहे. चला आज आपण या दोन्ही कारचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

   

स्पेसिफिकेशन

GTX + (S) आणि X-Line (S) या दोन्ही वेरियंटमध्ये दोन इंजन उपलब्ध करण्यात आले आहे. त्यापैकी एक म्हणजे 1.5 L टर्बो पेट्रोल आणि दुसरे म्हणजे 1.5L डिझेल इंजिन. यातील पेट्रोल इंजन 160 BHP पॉवर आणि 253 nm पिक टॉर्क जनरेट करते. तर डिझेल इंजन 115 BHP पॉवर आणि 114 nm पिक टॉर्क जनरेट करते. गाडीमध्ये पेट्रोल इंजनसह 7 स्पीड डीसीटी गिअर बॉक्स देण्यात आलेला असून डिझेल इंजिन सोबत सहा स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअर बॉक्स उपलब्ध आहे.

GTX + (S) फीचर आणि डिझाईन

GTX + (S) या व्हेरिएंट मध्ये कनेक्टिव्हिटी आणि अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहे. यामध्ये प्रीमियम इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस चार्जिंग, स्मार्टफोन इंटिग्रेशन, आणि आधुनिक टेक्नॉलॉजी हे फीचर्स देण्यात आले आहे. या कारमध्ये ADAS सिस्टीम देखील देण्यात आला आहे. जेणेकरून रस्त्यावरील सुरक्षितता आणि सुविधा दोन्ही सुनिश्चित करता येतील. म्हणजेच किआने नवीन सेलटॉसच्या नव्या वेरीएंट मध्ये सुरक्षिततेला जास्त प्राधान्य दिले आहे.

X-Line (S) फीचर

X-Line (S) हे नवीन व्हेरीएंट अशा व्यक्तींसाठी डिझाईन करण्यात आले आहे, ज्यांना थ्रील आणि ऑफ रोड थरारक अनुभव आवडतो. या नवीन च्या डिझाईन बद्दल आणि लूक बद्दल बोलायचं झालं तर ही कार आकर्षक स्टाईल, अप्रतिम ग्राउंड क्लिअरन्स, ऑल व्हील ड्राईव्ह यासोबतच खडतर ठिकाणी ड्राईव्ह करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. या कारमध्ये ADAS पॅकेज देण्यात आले आहे.

वेटिंग पिरियड

GTX + (S) आणि X-Line (S) या दोन्ही नवीन व्हेरीएंट साठी २ महिन्यांचा वेटिंग पीरियड देण्यात आला आहे. किआ इंडिया आता सॉनेट सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि कैरेंस एमपीव्ही अपडेट करण्याची तयारी करत आहे. यासोबतच न्यू जनरेशन किआ कार्निवलची देखील तयारी सुरू आहे. हे तिन्ही मॉडेल 2024 पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.