Kia Seltos अपडेटेड फीचर्ससह भारतात लाँच; किंमत पाहून व्हाल थक्क

टाइम्स मराठी । अखेर शुक्रवारी भारतात दक्षिण कोरियाच्या Kia Seltos ही चारचाकी गाडी दमदार फीचर्स सह लाँच करण्यात आली आहे. या फेसलिफ्ट मॉडेलच्या किंमती सुद्धा कंपनी कडून जाहीर करण्यात आल्या असून नवीन Kia Seltos फेसलिफ्टची सुरुवातीची किंमत 10.90 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. जी टॉप-स्पेक ऑटोमॅटिक व्हेरियंटसाठी 19.80 लाख रुपयांपर्यंत विकली जात आहे. या सर्व किंमती एक्स-शोरुमच्या आहेत. खास म्हणजे, नवीन सेल्टोसचे बुकिंग कंपनीने आधीच सुरू केले आहे.

   

Kia Seltos 2019 मध्ये भारतीय बाजारात आली होती. आता त्याचे फेसलिफ्ट मॉडेल बाजारात लॉन्च करण्यात आले आहे. कंपनीने नवीन सेल्टोसमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. ज्यामुळे ते आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक चांगले बनले आहे. सेल्टोस फेसलिफ्ट ही किआच्या ‘ऑपोजिट्स युनायटेड’ डिझाईन तत्त्वज्ञानावर तयार करण्यात आली आहे.

Kia Seltos ची वैशिष्ट्ये –

नवीन सेल्टोस फेसलिफ्टमध्ये 26.04 सेमी पूर्ण डिजिटल क्लस्टर, 26.03 सेमी एचडी टचस्क्रीन नेव्हिगेशन आहे. तसेच ड्युअल झोन पूर्ण स्वयंचलित एअर कंडिशनर आणि 18-इंच सेमी क्रिस्टल कट ग्लॉसी ब्लॅक अलॉय व्हीलसह ड्युअल स्क्रीन पॅनोरॅमिक डिस्प्ले देखील आहे. याशिवाय कंपनीने कारमध्ये ड्युअल पॅन पॅनोरामिक सनरूफ आणि इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेकचाही समावेश केला आहे.

इंजिन – Kia Seltos

Kia Seltos फेसलिफ्टमध्ये 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 158 bhp ची कमाल पॉवर आणि 253 Nm टॉर्क जनरेट करते . या नवीन कारला 6-स्पीड iMT आणि 7-स्पीड DCT गिअरबॉक्स देण्यात आले आहे .

अन्य फीचर्स –

सेल्टोस फेसलिफ्टमध्ये 2 ADAS चा वापर करण्यात आला आहे. तसेच खास 15 फीचर्स आणि 17 ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत.या SUV ला 6 एअरबॅग आणि 3 पॉइंट सीट बेल्ट देखील उपलब्ध आहेत. सोबतच ABS, BAS, ऑल व्हील डिस्क ब्रेक्स, ESC, VSM हे खास फीचर्स देखील सेल्टोस फेसलिफ्टमध्ये आहेत.