Kinetic Green ने लाँच केली नवी Electric Scooter; देते 104 KM पर्यंत रेंज

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहन सेगमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या नवीन स्कूटर लॉन्च करत आहेत. अशातच आता इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Kinetic Green ने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर zulu लॉन्च  केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची मुंबईमध्ये एक्स शोरूम किंमत 94,990 रुपये आहे.

   

104 किलोमीटर पर्यंत रेंज-

या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या Kinetic zulu इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये कंपनीने 2.7 kwh क्षमता असलेले लिथियम आयन बॅटरी पॅक दिली आहे. ही बॅटरी चार्ज होण्यासाठी 15 एंपियर सॉकेट चार्जर देण्यात आले आहे. या बॅटरी सोबतच इलेक्ट्रिक मोटर देखील सुसज्ज करण्यात आली आहे. ही  BLDC टेक्नॉलॉजी वर आधारित हब माऊंटेड इलेक्ट्रिक मोटर असून 2.8 BHP पावर प्रदान करते.Kinetic zulu ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर 104 किलोमीटर पर्यंत रेंज देते. यासोबतच 60 किलोमीटर प्रतितास इतकं टॉप स्पीड ही इलेक्ट्रिक स्कुटर देते.

फीचर्स

Kinetic zulu या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, साईड स्टँड सेन्सर, USB चार्जिंग पोर्ट, अंडरसीट स्टोरेज लाइटिंग, LED DRL , ऑटो कट चार्जर यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फ्रंट आणि रियर दोन्ही व्हीलमध्ये कंपनीने डिस्क ब्रेक वापरला आहे. यासोबतच इलेक्ट्रिक स्कूटरच्या फ्रंटला टेलिस्कोपिक टाईप हायड्रोलिक सस्पेन्शन आणि रियल मध्ये स्प्रिंग बेस्ड शॉक अब्सोर्बर देण्यात आले आहे.

कलर

Kinetic कंपनीने zulu मध्ये सहा कलर ऑप्शन उपलब्ध केले आहे. यामध्ये क्लाऊड ग्रे, FB ब्ल्यू, पिक्सल व्हाईट , ब्लॅक एक्स, इंस्टा ऑरेंज आणि युट्युब रेड या रंगांचा पर्याय उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे वजन 93 किलोग्रॅम आहे. म्हणजेच वजनाने हलकी स्कूटर आहे.