पावसाळ्यात किचन फ्रेश आणि नीटनेटके ठेवायचं आहे? ‘या’ सोप्या टिप्स वापरा

टाइम्स मराठी । सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यामध्ये आपण कितीही घराची साफसफाई केली तरीही मोठ्या प्रमाणात घाण दिसते. आणि ही घाण किचन पर्यंत कशी येईल हे सांगता येत नाही. जर पावसाळ्यामध्ये साफसफाई केली नाही तर किडे ,घाण वास याचा आपल्याला त्रास सहन करावा लागतो. आणि साफसफाई केल्यास किंवा पोचा मारल्यास फरशी लवकर देखील सुकत नाही. किचन मध्ये देखील अशीच अवस्था असते. जर तुम्हाला देखील या समस्येला तोंड द्यावे लागत असेल तर किचन मध्ये नेमकी कशी साफसफाई करायची याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

   

1) कापड वापरणे –

किचनमध्ये बऱ्याचदा ओले भांडे पुसण्यासाठी आपण बऱ्याच कपड्यांचा वापर करतो. त्यामुळे लवकर भांडी साफ होतात. परंतु सर्वात जास्त पावसाचा आणि गर्मीचा परिणाम पोछा किंवा कपड्यावर जास्त दिसतो. गर्मीमुळे कपडा लवकर वाळत नाही. त्यामुळे घाण वास यायला सुरुवात होते. यावर एक उपाय म्हणजे वाइप्स. तुम्ही वाईफ्स चा वापर करून साफसफाई करू शकतात. त्यामुळे ते सुकण्याची चिंता राहणार नाही.

2) वायफर-

किचन मध्ये भांडी घासल्यानंतर सिंकभोवती आणि स्लॅबमध्ये पाणी साचते. आपण किचन साफ करण्यासाठी कपड्याचा वापर करतो. परंतु पावसाळ्यामध्ये हे कपडे वाळत नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी हाच कपडा आपण वापरू शकत नाही. कारण त्याचा भयंकर प्रमाणात घाण वास येतो. यापासून वाचण्यासाठी तुम्ही वायफर चा वापर करू शकतात. जेणेकरून किचन स्वच्छ होईल आणि तुमचा त्रासही वाचेल.

3) लिक्विड डिश वॉश-

आपण भांडे धुण्यासाठी साबणाचा वापर करतो. परंतु गर्मीमुळे पावसाळ्याच्या दिवसात हा साबण पूर्णपणे वितळतो. त्यामुळे लिक्विड डिश वॉश हा पर्याय भांडे धुण्यासाठी चांगला आहे. त्यामुळे तुमचं काम सोप्प होईल.

4) भांडी ठेवायला टोपली-

पावसाळ्याच्या सीझनमध्ये ज्याप्रमाणे कपडे सुकवण्यासाठी अडचण येते, त्याचप्रमाणे या सीझनमध्ये भांडे सुकण्यासाठी देखील मोठी अडचण निर्माण होते. अशावेळी साफ केलेले सर्व भांडे एका टोपलीमध्ये ठेवले तर पाणी निथरण्यासाठी आणि सुखण्यासाठी मोठा फायदा होतो.