Oppo A78 Vs iQOO Neo 7 Pro : कोणता मोबाईल बेस्ट? पहा कॅमेरा, फीचर्ससह संपूर्ण तुलना

टाइम्स मराठी । आजच्या काळात स्मार्टफोन ही प्रत्येकाच्या आयुष्याची गरज बनली आहे. बाजारात दिवसेंदिवस अनेक वेगवेगळे स्मार्टफोन उपलब्ध होत आहेत. पण यातील नक्की कोणता स्मार्टफोन घ्यावा हे आपल्या लक्षात येत नाही. सध्या बाजारात Oppo A78 आणि iQOO Neo 7 Pro हे २ नवीन स्मार्टफोन लाँच झालेले आहेत. अतिशय दमदार फीचर्सनी हे दोन्हीही स्मार्टफोन सुसज्ज आहेत. परंतु यातील नेमका कोणता मोबाईल खरेदी करावा याबाबत तुमच्या मनात गोंधळ असेल तर आज आम्ही या दोन स्मार्टफोनची तुलना करून सांगणार आहोत, त्यानुसार तुम्हीच ठरवा नेमका कोणता मोबाईल तुमच्यासाठी बेस्ट ठरेल

   

iQOO Neo 7 Pro 5G चे फीचर्स

बाजारात नुकताच iQOO Neo 7 Pro स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा AMOLED फ्लॅट डिस्प्ले, १२० Hz चा रिफ्रेश रेट, Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटला सपोर्ट आणि डिस्प्लेमध्ये फुल एचडी कॉलिटी कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. तसेच यामध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज ही देण्यात आले आहे. iQOO Neo 7 Pro हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित FuntouchOS 13 वर चालत आहे. iQOO Neo 7 Pro 5G या फोनमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी फक्त ८ मिनिटात ५० टक्के आणि ३० मिनिटांमध्ये १०० टक्के चार्ज होण्याची क्षमता ठेवते.

Oppo A78 चे Features

Oppo A78 फोनमध्ये A78 ड्युअल सिम, ColorOS 13.1 कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. तसेच हा फोन अनस्पेसिफाईड व्हर्जनवर चालणारा आहे. Oppo A78 ला ६.४२ इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यासोबतच, या फोनमध्ये Adreno 610 GPU सह ८ जीबी LPDDR4X रॅम देण्यात आली आहे. Oppo A78 mdhye 128 जीबी इनबिल्ट UFS 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे.

iQOO Neo 7 Pro 5G किंमत

सध्या बाजारात लोकप्रिय ठरत असणारा QOO Neo 7 Pro 5G हा ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३४,९९९ विकला जात आहे. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत ३७,९९९ रुपयात बाजारात उपलब्ध आहे. हा फोन जर तुम्ही फ्लिपकार्ट किंवा इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी केला तर 33,999 रुपयांपर्यंत कमी किमतीत मिळत आहे. iQOO Neo 7 Pro 5G स्मार्टफोन Fearless Flame आणि Dark Storm अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे

Oppo A78 किंमत

Oppo A78 बाजारात लॉन्च झाल्यापासून त्याची किंमत १७,४९९ रुपये इतकी आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसाठी हा फोन एकाच किमतीत उपलब्ध आहे. Oppo A78 Green आणि Mist Black या दोन रंगांमध्ये ग्राहकांना मिळत आहे. ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्मवर 18,999 रुपयांना विकला जात आहे. जर तुम्ही हा फोन ॲक्सिस किंवा इतर बँकच्या डेबिटकार्ड वरून खरेदी केला तर तुम्हाला यामध्ये सवलत देखील मिळेल.