Ola ला टक्कर देणार ‘ही’ Electric Scooter; 150 KM रेंज अन् बरंच काही….

टाइम्स मराठी | गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. अनेक वाहन उत्पादन कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणत असल्याने मार्केट मध्ये स्पर्धाही वाढली आहे. या वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहकांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक गाड्या बाजारात उपलब्ध होत आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ईव्ही कंपनी Komaki Electric Scooters ने आपली SE इलेक्ट्रिक स्कुटर 3 व्हेरिएन्ट मध्ये लाँच केली आहे. ही स्कुटर Ola इलेक्ट्रिक ला थेट टक्कर देईल. आज आपण जाणून घेऊया या गाडीची खास फीचर्स आणि तिच्या किमतीबद्दल….

   

फीचर्स

कोमाकी SE इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्स बद्दल जाणून घ्यायचं झालं तर तिन्ही व्हेरिएन्ट मध्ये सेप्टीचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये ड्युअल डिस्क ब्रेक देण्यात आलेला असून 3000 व्हॅट ची मोटर देखील बसवण्यात आलेली आहे. ही स्कूटर क्रूझ कंट्रोल, पार्क असिस्ट, रिव्हर्स मोड, TFT स्क्रीन, नेव्हिगेशन, कॉलिंग, अँटी स्किड टेक्नॉलॉजी, कीलेस एंट्री या फीचर्सने परिपूर्ण आहे.

बॅटरी क्षमता आणि रेंज-

या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये लिथियम आयन फॉस्फेट बॅटरीचा वापर करण्यात आला असून ही फायर प्रोटेक्टेड बॅटरी आहे. ही बॅटरी फुल्ल चार्ज होण्यासाठी 3 -4 तासांचा वेळ लागतो. कोमाकीची ही इलेक्ट्रिक स्कुटर इको, स्पोर्ट आणि टर्बो या 3 रायडींग मोड मध्ये लाँच करण्यात आली आहे. गाडीच्या रेंज आणि स्पीड बाबत बाबत सांगायच झाल्यास इको मोडेल ची रेंज ही 75 ते 90 किलोमीटर असून टॉप स्पीड 55 ते 60 किलोमीटर प्रति तास आहे. स्पोर्ट मोडची रेंज 110-140 किमी असून टॉप स्पीड प्रतितास 75-80 किलोमीटर आहे. तर टर्बो मोडमध्ये ही इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 150-180 किलोमीटर पर्यंत धावू शकते आणि तिचे टॉप स्पीड 75 ते 80 किमी प्रतितास इतकं आहे.

किंमत किती-

या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत तिच्या व्हेरिएन्ट नुसार वेगवेगळी आहे. इको व्हेरिएन्टची किंमत 96 हजार 968 एवढी आहे. SE स्पोर्ट व्हेरिएन्टची किंमत 1 लाख 29 हजार 932 तर SE स्पोर्ट परफॉर्मन्सची किंमत 1 लाख 38 हजार 427 आहे. या तिन्ही स्कुटर च्या किमती x शोरूम दिल्ली नुसार आहे.