Koo App Shutting Down : KOO App झालं बंद!! संस्थापकांनी स्वतःच दिली माहिती

टाइम्स मराठी । स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म KOO अँप बंद (Koo App Shutting Down) झालं आहे. KOO चे संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिदावतका यांनी याबाबत माहिती दिली आहे. पार्टनर सोबतची चर्चा अयशस्वी झाल्यामुळे आणि तंत्रज्ञानाच्या उच्च खर्चामुळे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करण्यात आल्याचे संस्थापकांनी सांगितले. कंपनीच्या या निर्णयामुळे koo यूजर्सना धक्का बसला आहे.

   

खरं तर ट्विटरला टक्कर देणारे अँप म्हणून KOO अँप कडे बघितलं जात होते. या अँप वर 9 हजार VIP लोकांचे अकाउंट होते. देशातील राजकारणी, मंत्री ते खेळाडूंपर्यंत देशभरातील अनेक दिग्गजांनी KOO अँप वर अकाउंट काढलं होते. रोजच्या घडामोडी कु अँप हे हे सर्वजण टाकत होते. अनेक नेते आणि कॅबिनेट मंत्र्यांनी कूवर स्वतःच अकाउंट काढून प्रचार सुद्धा केला होता. एक काळ तर असा होता जेव्हा कूच्या रोजच्या युजर्सची संख्या 21 लाखांवर पोहोचली होती. तर महिन्याच्या युजर्सची संख्याही 1 कोटींवर पोहोचली होती. मात्र आता कु अँप बंद पडल्याने (Koo App Shutting Down) या सर्व वापरकर्त्यांना हे अँप वापरता येणार नाही.

KOO App का बंद झालं- (Koo App Shutting Down)

तंत्रज्ञानावरील खर्च आणि अनपेक्षित बाजार भांडवल या दोन्ही कारणामुळे KOO अँप बंद करण्यात येत असल्याचे कंपनीच्या संस्थापकांनी स्पष्ट केलं. कंपनीची काही मालमत्ता विकण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय सोशल मीडियामध्ये काहीतरी चांगले करण्याचा विचार करणाऱ्या लोकांसोबत ही मालमत्ता शेअर करताना आम्हाला आनंद होईल असं संस्थापकांनी आपल्या नोटमध्ये लिहिलं. कंपनीच्या फेअरवेल वेळी संस्थापकांनी सपोर्टर्स , टीम , गुंतवणूकदार, निर्माते आणि यूजर्स यान सर्वाना निरोप दिला आहे.