KTM ने आणली 1390 Super Duke R बाईक; जाणून घ्या फीचर्स

टाइम्स मराठी । KTM बाईक भारतीय मार्केटमध्ये तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. आता केटीएम कंपनीने 2024 KTM 1390 Super Duke R चे अनावरण केले आहे. कंपनीने या बाईक मध्ये डिझाईन सोबतच बरेच बदल केले आहे. ही KTM कंपनीची नवीन स्ट्रीट नेकेड बाईक असून यामध्ये बरेच अपडेट दिसून येतील. KTM कंपनीची ही नवीन बाईक जानेवारी 2024 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. जाणून घेऊया या नवीन बाईकचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

डिझाईन

2024 KTM 1390 Super Duke R या बाईकच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर, ही बाईक नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या 990 Duke प्रमाणेच डिझाईन करण्यात आली आहे. या बाईक मध्ये  DRL सोबतच व्हर्टिकली स्ट्रॅक LED हेडलाईट देण्यात आले आहे. या बाईकमध्ये विंगलेट्स आणि मोठा 17.5 लिटर फ्युएल टॅंक देण्यात आले आहे. 

स्पेसिफिकेशन

2024 KTM 1390 Super Duke R या बाईकमध्ये दमदार इंजिन मिळते. KTM कंपनीने स्टॉक वाढवला असून या बाईक मध्ये आता 1350cc इंजिन देण्यात आले आहे. यामुळे बाईकची पावर वाढली आहे. हे नवीन LC8 V ट्विन इंजिन 187.4 BHP पावर आणि 145  NM पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत  6 स्पीड गिअरबॉक्स स्लीप आणि असिस्ट क्लच सुसज्ज करण्यात आले आहे.

इंजिन

या नवीन इंजिन मध्ये कॅम शिफ्ट सिस्टीम वापरण्यात आली आहे. ज्याला व्हेरिएबल वॉल्व टायमिंग या नावाने देखील ओळखले जाते. या सिस्टीम मुळे इंजिनला संपूर्ण रेव रेंजमध्ये अप्रतिम पावर आणि टॉर्क जनरेट करण्यासाठी मदत होते. ही कॅम शिफ्ट सिस्टीम सिलेंडर हेड्स मध्ये बसवण्यात आली आहे. या कॅम शिफ्ट सिस्टीम वॉल्वला वेगवेगळ्या स्टेजवर खोलण्याची अनुमती मिळते. ज्यामुळे नवीनतम उत्सर्जन मानदंड पूर्ण करत असताना  हे इंजिन जुन्या मॉडेलच्या तुलनेत 10 BHP अधिक पावर विकसित करते.

फिचर्स

2024 KTM 1390 Super Duke R या नवीन बाईक मध्ये दोन्ही साईड ने सेमी ऍक्टिव्ह WP सस्पेन्शन, ब्रेम्बो मोनोब्लॉक कॅलिपर्स देण्यात आले आहे. यासोबतच दोन्ही साईडने  डिस्क ब्रेक आणि सुपर स्टिकी मिशेलिन पावर GP टायर्स मध्ये गुंडाळलेले 17 इंच टायर, TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल, की-लेस पिलीयन यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. त्याचबरोबर बाईकमध्ये सीट रोवल ऑप्शन देखील उपलब्ध आहे.