KTM 390 Duke अवघ्या 72000 रुपयांत घरी घेऊन जावा; काय आहे ऑफर

टाइम्स मराठी । KTM ही दुचाकी निर्माता कंपनी जगभरात स्पोर्ट्स बाईकची विक्री करते. खास तरुण जगभरातील तरुणांना KTM बाईकच चांगलंच वेड असलयाने आपण पाहतो. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन पॉवरमुळे अनेकांना KTM खरेदीची इच्छा असते. परंतु महाग किमतीमुळे अनेकांना ती खरेदी करणं शक्य नसत. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका ऑफर बद्दल सांगणार आहोत त्यामाध्यमातून तुम्ही फक्त ७२ हजार रुपयांत KTM 390 Duke घरी घेऊन जाऊ शकता. चला तर जाणून घेऊया ही ऑफर नेमकी आहे तरी काय?

   

काय आहे ऑफर?

KTM 390 Duke या बाईकची किंमत 3.11 लाख रुपये एवढी असून ही बाईक तुम्ही फायनान्स ऑफरनुसार खरेदी करू शकतात. त्यानुसार तुम्ही 2 हजार रुपयांचे डाउनपेमेंट भरून ही बाईक खरेदी करू शकतात. त्यासाठी तुम्हाला 2.86 लाख रुपये लोन घ्यावे लागेल. आणि EMI च्या माध्यमातून तुम्ही 9,231 रुपये प्रति महिना भरून ३ वर्षांसाठी भरून तुमचं लोन फेडू शकता.

काय आहेत KTM 390 Duke चे फीचर्स?

KTM 390 Duke या न्यू जनरेशन बाईक मध्ये 399 cc इंजन देण्यात आले आहे. हे इंजन 45 HP पावर आणि 39 NM पिक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पूर्णपणे नवीन ट्रेलीस फ्रेम सह उपलब्ध करण्यात आले आहे. या फ्रेम मध्ये ॲल्युमिनियम सब फ्रेम आणि नवीन सस्पेन्शन देण्यात आले आहे. यासोबतच या बाईकमध्ये अपडेटेड अपसाईड डाऊन फोर्क आणि नवीन ऑफसेट मोनोशॉक, न्यू डिझाईन स्विंगआर्म देखील देण्यात आले आहे.

फीचर

KTM 390 Duke मध्ये नवीन टॅंक एक्सटेन्शन, नवीन हेडलाईट डिझाईन, देण्यात आली आहे. यासोबतच या बाईकमध्ये तीन रायटिंग मोड उपलब्ध आहे. त्यापैकी पहिला म्हणजे स्ट्रीट, दुसरा ट्रॅक, आणि रेन. बाजारात ही बाईक बीएमडब्ल्यू G310, बजाज डोमिनार 400, ट्रायम्प स्पीड 400, tvs अपाचे RTR 310 यासारख्या बाईक सोबत प्रतिस्पर्धा करते.