टाइम्स मराठी | इटलीमध्ये सुरू असलेल्या EICMA 2023 या मोटर शो मध्ये बऱ्याच ऑटोमोबाईल वाहन निर्माता कंपन्या नवीन वाहने सादर करत आहेत. या शोमध्ये Yamaha, Honda, Suzuki, Hero Motocorp, KTM यासारख्या बऱ्याच कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. यावेळी KTM ने या इव्हेंटमध्ये नवीन 990 Duke या बाईकचे अनावरण केले आहे. ही एक परफॉर्मन्स ओरिएंटेड नेकेड बाईक असून जागतिक मार्केटमध्ये लवकरच लॉन्चिंग साठी उपलब्ध करण्यात येणार आहे. जाणून घेऊया या बाईकचे फीचर्स.
इंजिन-
KTM 990 Duke या बाईक मध्ये ओवरहोल्ड LC8c इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 9500 RPM वर 123 PS पावर जनरेट करते. आणि 6750 RPM वर 103 NM पिक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन सोबत 6 स्पीड गिअर बॉक्सला जोडण्यात आले आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेल्या KTM 890 DUKE R या बाईक मध्ये असलेले इंजिन या नवीन बाईक मध्ये वापरण्यात आले आहे.
KTM 990 DUKE या बाईक मध्ये ड्युअल 300 mm फ्लोटिंग डिस्क, रियर मध्ये 240 mm डिस्क देण्यात आली आहे. यासोबतच 4 पिस्टन रेडियल माऊंटेड कॅलिपर्स देखील यामध्ये उपलब्ध आहे. कंपनीकडून या बाईकमध्ये फुल्ली ॲडजस्टेबल WP एपेक्स अपसाईड डाऊन फ्रंट फोर्क्स आणि रियर मध्ये मोनोशॉक देण्यात आले आहे.
फीचर्स- KTM 990 Duke
गाडीच्या फीचर्स बद्दल सांगायचं झाल्यास, KTM 990 DUKE या बाईक मध्ये बाय डायरेक्शनल क्विक शिफ्टर, ट्रॅक्शन कंट्रोल, 5 इंच कलर TFT डिस्प्ले, लॉन्च कंट्रोल, कमिंग होम लाईट फंक्शन, ऑप्शनल परफॉर्मन्स आणि यूएसबी टाइप सी पोर्ट, सुपर मोटो एबीएस, स्लीप अँड असिस्ट क्लच यासारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहे. 990 DUKE या बाईक मध्ये स्प्लिट DRL, प्रोजेक्टर हेडलॅम्प, शार्प आणि अँग्युलर फ्युल टॅंक एक्सटेंशन, 14.5 लिटर फ्युल इंधन टॅंक देण्यात आले आहे. याशिवाय बाईकमध्ये कंपनीने तीन रायटिंग मोड उपलब्ध केले आहे. त्यानुसार रेन, स्ट्रीट आणि स्पोर्ट, यासोबतच ट्रेक मोड देखील यामध्ये उपलब्ध आहे.