लाल किताब मधील ‘हे’ 12 उपाय केल्यास तुमचे आयुष्य बनेल सुखी समाधानी

टाइम्स मराठी | वैदिक ज्योतिष शास्त्रावर आधारित असलेली लाल किताब आपल्या जीवनातील काही समस्यांवर सुटका मिळवून देऊ शकते. ही एक वैदिक ज्योतिषवर आधारित लोकप्रिय किताब आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचे उपाय सांगण्यात आले असून हे उपाय केल्यावर बऱ्याच प्रकारच्या अडचणी आणि समस्या आपल्या आयुष्यातून निघून जातात. या किताब मध्ये दिलेले उपाय केल्यास आर्थिक तंगी दूर होते.

   

लाल किताब मध्ये सांगितले आहे की, जर तुम्ही प्रचंड मेहनत करत असाल, पण तरीही दारिद्र्य पासून लांब जाऊ शकत नसाल तर ग्रहांची दशा ठीक नसेल. अशावेळी तुम्हाला लाल पुस्तक मध्ये दिलेले काही अचूक उपाय खरच करायला पाहिजे. ज्यामुळे तुम्हाला याचा लाभ होऊ शकेल.

  1. लाल पुस्तकाच्या अनुसार पैसे मिळवण्यासाठी एक चांदी किंवा सोन्याचे नाणे घ्या. ते लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळा. आणि तुमच्या तिजोरी मध्ये ठेवा. यामुळे पैसे मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग खुले होतील.
  2. त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह कमजोर असेल तर गाईला गुळ खाऊ घाला. यामुळे गुरु ग्रह प्रसन्न होईल. आणि तुमच्या जीवनात समृद्धी लाभेल.
  3. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहाची दशा वाईट असेल तर त्याला जीवनामध्ये नकारात्मकतेचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी उपाय म्हणून बुधवारी गाईला चारा खाऊ घातल्याने बुध ग्रहाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.
  4. जर तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल तर यावर उपाय म्हणून तुम्ही तांब्याची तीन नाणी तुमच्या पर्समध्ये ठेवा. त्यामुळे जीवनातील अचानक आलेली आर्थिक संकटे निघून जातील. आणि सुख समृद्धी लाभेल
  5. लाल किताबच्या नुसार शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला शनिवारी गरजूंना चप्पल आणि बूट दान करावे लागेल. त्यामुळे तुमच्या कुंडलीतील शनीच्या अशुभ दशेचा प्रभावही कमी होईल.
  6. तुमच्या करिअरमध्ये किंवा बिझनेस मध्ये काही बाधा येत असेल तर कुत्र्याला पोळी खाऊ घाला.
  7. कोणताही प्रवासाला जाण्यापूर्वी थोडासा गूळ खाल्ल्यानंतर पाणी प्या यामुळे प्रवास मंगलमय होईल.
  8. घरातील मोठ्या, बुजुर्ग महिलांचा आदर आणि सन्मान करा. आणि आशीर्वाद घ्या.
  9. उन्हाळ्यात रस्त्यावर थंड पाण्याची व्यवस्था करा
  10. तर्जनी बोटामध्ये चांदीची अंगठी धारण करा
  11. मंदिरात सरसोच्या तेलाचा दिवा लावा.
  12. हिंदू धर्मामध्ये तुळशीचे रोप हे शुभ मानले जाते. त्यामुळे प्रत्येक घरात तुळशी असणे गरजेचे आहे.