Lamborghini Huracan Sterrato ची भारतात एंट्री!! फक्त 15 युनिटची होणार विक्री

टाइम्स मराठी । Luxury स्पोर्ट कार म्हणून ओळखल्या जाणारी इटालियन Lamborghini या कारची क्रेज संपूर्ण जगभरामध्ये दिसून येते. इटालियन स्पोर्ट कार मॅन्युफॅक्चरर लेम्बोर्गिनीने मागच्या वर्षी 30 नोव्हेंबरला हुराकैन स्टेराटो ही कार लॉन्च केली होती. यावेळी कंपनीच्या माध्यमातून 1499 युनिट विक्री करण्यात आली होते. आता या कारने भारतात एंट्रीकेली असून देशभरात फक्त 15 युनिट्स विक्री करण्यात येणार आहे. आज आपण या डॅशिंग कारचे खास फीचर्स जाणून घेऊया…

   

Lamborghini Huracan Sterrato या शानदार लक्झरी स्पोर्ट कार मध्ये 5. 2 L NA  V10 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 600 BHP पावर प्रदान करते आणि 560 nm पीक टॉर्क जनरेट करते. Lamborghini च्या या गाडीचे टॉप स्पीड स्पीड 260 किलोमीटर प्रति तास इतकं असून अवघ्या 3.4 सेकंदामध्ये ही कार शून्य ते शंभर किलोमीटर प्रति तास वेग वाढवण्यास सक्षम आहे.

Lamborghini Huracan Sterrato च्या समोर 19 इंच फोज्र्ड ब्लॅक रिम्स आणि पिवळ्या सीसीबी कॅलिपरला आणि कारच्या बॉडीला गिग्रीयो लिंक्स शेड फिनिशिंग देण्यात आली आहे. या कारमध्ये एयर इंटेक  कॉर्नर ऐवजी रूफ वर देण्यात आले आहे. या कारमध्ये कंपनीने अपडेटेड व्हीकल डायनामिक पॅक आणि लेम्बोर्गिनी इंटिग्रेटेड व्हिकल डायनामिक LDVI देखील उपलब्ध करण्यात आले आहे.

गाडीच्या इंटरियर बद्दल बोलायचं झालं तर, केबिन मध्ये अल्केनटारा वर्डे अपहोस्ट्री, पीच आणि रोल इंडिकेटर, डिजिटल इनक्लीनोमीटर, कंपास, जिओग्राफिक, कोऑर्डिनेट इंटिग्रेटर सह स्टिअरिंग एंगल इंडिकेटर्स देखील देण्यात आले आहे. या कारमध्ये छोट्या साईज मध्ये व्हील आणि मोठया साईडवॉल सह ऑल टेरेन टायर्स उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे टायर फुटण्याची शक्यता कमी होते. आणि ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्स देखील वाढतो.

Lamborghini Huracan Sterrato चा ग्राउंड क्लिअरन्स 171 mm एवढा आहे. या कार मध्ये फ्रंट आणि बॅक साईडला स्कीड प्लेट आणि अंडर बॉडी प्रोटेक्शन देण्यात आले आहे. या लक्झरी कारची किंमत 4.61 करोड रुपये एवढी आहे. ही कार Porsche 911 Sports Car सोबत प्रतिस्पर्धा करते. या कारच्या फक्त 15 मॉडेल भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.  त्यानुसार तुम्ही लवकरात लवकर प्री ऑर्डर करू शकतात.