Lamborghini Revuelto भारतीय मार्केटमध्ये लॉन्च; किंमत वाचून तुमचेही डोळे फिरतील

Lamborghini Revuelto : Lamborghini कंपनीने भारतीय बाजारपेठेत फ्लॅगशिप सुपरकार लॉन्च केली आहे. Lamborghini Revuelto असे या नव्या गाडीचे नाव आहे. यापूर्वी कंपनीने ही कार आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 2023 च्या सुरुवातीलाच लॉन्च केली होती. आता कंपनीने भारतीय बाजारपेठेत ही कार लॉन्च केली आहे. कंपनीने या कारची किंमत 8.9 कोटी रुपये ठेवली आहे. त्याचबरोबर ही कार Lamborghini Revuelto ही कार एवेंटाडोर ला रिप्लेस करते. इलेक्ट्रिफाईट पॉवरट्रेन असलेली ही पहिली Lamborghini  आहे. आज आपण जाणून घेऊया या सुपरकारचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

इंजिन 

Lamborghini Revuelto या सुपरकार मध्ये इलेक्ट्रिक मोटर सोबत एक लहान इलेक्ट्रिक रेंज वाला बॅटरी पॅक देखील देण्यात आला आहे. त्यानुसार या कारमध्ये 6.5 लिटर नॅचरली अस्पिरिटेड V12 पेट्रोल इंजिन मिळते. या कार मध्ये देण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर 1015 ps पावर प्रदान करते. ही सर्वात जास्त पावरफुल कार आहे. या इंजिनसह 8 स्पीड DCT म्हणजेच ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्स आणि ऑल व्हील ड्राईव्हट्रेन AWD मिळते. Lamborghini Revuelto ही सुपरकार 350 km प्रति घंटा एवढी टॉप स्पीड देते. यासोबतच 2.5 सेकंदामध्ये 0 ते 100 किलोमीटर स्पीड पकडण्यास ही कार सक्षम आहे. 

डिझाईन – Lamborghini Revuelto

Lamborghini Revuelto ही स्टायलिश सुपर कार आहे. यामध्ये Y शेप डिटेलिंग देण्यात आल्यामुळे एवेंटाडोर पेक्षा जास्त अग्रेसिव्ह दिसते. या कारमध्ये एक्झॉस्ट हे मागच्या साईडने वरच्या बाजूस देण्यात आले आहे. या सुपरकारचे दरवाजे देखील अप्रतिम पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे.

फिचर्स

Lamborghini Revuelto या सुपरकारच्या केबिनमध्ये तीन स्क्रीन मिळतात. यामध्ये 12.3 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 8.4 इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम, पॅसेंजर साठी 9.1 इंच स्क्रीन देण्यात आली आहे . यामध्ये ऍडव्हान्स ड्राईव्ह असिस्ट सिस्टीम ADAS देखील मिळते. या सुपर कार मध्ये एवेंटाडोर पेक्षा जास्त स्पेस मिळतो. Lamborghini Revuelto या सुपरकारच्या माध्यमातून इटालियन सुपरकार ब्रँड साठी एक इलेक्ट्रिफाइड प्रवासाची सुरुवात आहे. यानंतर भविष्यात कंपनीकडून आणखीन जास्त इलेक्ट्रिफाइड कार डेव्हलप करण्यात येतील.