इटालियन ब्रँड Lambretta ने लॉन्च केली नवीन Elytra e Concept स्कूटर

टाइम्स मराठी । भारतात इटालियन ब्रँड म्हणून ओळखल्या जाणारा Lambretta हा लोकप्रिय स्कूटर ब्रँड आहे. 1960-70 या दशकामध्ये  या ब्रँडची स्कूटर अतिशय लोकप्रिय होती. परंतु आधुनिक आणि देशांतर्गत स्कूटर ब्रँडच्या आगमनामुळे Lambretta या ब्रँडला भारतातून पसार व्हावे लागले. त्यानंतर युरोपीय मार्केटमध्ये टू व्हीलर सेगमेंट मध्ये कंपनीने या ब्रँडला मजबुती दिली. आता भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक सेगमेंटची मोठ्या प्रमाणात चलती आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी कडे वाढता कल पाहता या लॅब्रेटा ब्रँड ने  बॅटरीवर चालणारे मॉडेल लॉन्च केले आहे. या मॉडेलच्या माध्यमातून कंपनीने आता भारतात एन्ट्री केली आहे.

   

मोड्स

इटलीमध्ये सुरू असलेल्या EICMA 2023 या मोटर शो मध्ये  Lambretta ने पहिले प्रोटोटाईप इलेक्ट्रिक स्कूटर प्रदर्शित केले. या स्कूटरमध्ये कंपनीने तीन राईड मोड उपलब्ध केले आहे. त्यानुसार इको, राईड आणि स्पोर्ट्स हे मोड देण्यात आले आहे.  या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये कंपनीने मॉडर्न डिझाईन लँग्वेज दिली आहे. यासोबतच फ्लोटिंग सिंगल सीट देखील रेट्रो लुक मध्ये देण्यात आली आहे.

बॅटरी

Lambretta Elytra e Concept या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 11KW इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 4.6  KWH बॅटरी पॅक सह सुसज्ज करण्यात आली आहे. ही बॅटरी 220 V च्या होम चार्जर ने 5 तासांमध्ये 30 मिनिटांपर्यंत पूर्णपणे चार्ज होते. आणि फास्ट चार्जर च्या मदतीने  35 मिनिटांमध्ये 80 टक्के चार्ज होते. ही स्कूटर इको मोड मध्ये सिंगल चार्जवर  127 किलोमीटर एवढी रेंज देते.

ब्रेकिंग सिस्टीम

ही इलेक्ट्रिक स्कूटर स्टील ट्रेलिंग फ्रेमवर डेव्हलप करण्यात आली आहे. याशिवाय  या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये DRL हेक्सागोनल LED हेडलॅम्प देण्यात आले असून मॉडर्न डिझाईन लँग्वेज देखील मिळते. यामध्ये ब्रेकिंग साठी सिंगल डिस्क ब्रेक सेटअप उपलब्ध आहे. याशिवाय सिग्नेचर ट्रेलिंग लिंक फ्रंट सस्पेन्शन आणि रियर मध्ये मोनोशॉक उपलब्ध आहे.