Landslide : भूस्खलन म्हणजे नेमके काय? ते थांबवण्यासाठी कोणते उपाय राबवावेत

टाइम्स मराठी । गेल्या काही दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. या घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला असून १४१ जणांना वाचवण्यात बचाव कार्य पथकाला यश आले. यापूर्वी अशाच दुर्घटना महाडमधल्या तळीये गावात आणि आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावात घडल्या होत्या. यामुळेच राज्यात भूस्खलन (Landslide) सारख्या घटना सतत घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवरच आपल्याला भूस्खलन म्हणजे काय, त्यामागील नेमकी कारणे काय हे समजून घेणे आवश्यक आहे.

   

भूस्खलन म्हणजे डोंगरकड्यांवरून दरड कोसळणे किंवा खडक कोसळले, जमीन खचणे होय. अशा घटनांमध्ये जास्त प्रमाणात आर्थिक आणि मानवीहानी होते. भूस्खलन होण्याचा वेग एवढा असतो की, आपण त्या वेळात काहीच करू शकत नाही. भूस्खलन कधी होईल याचा अंदाज लावणे आपल्याला सहज शक्य नसते. किंवा अशावेळी तात्काळ उपाययोजना करणे देखील शक्य नसते. स्खलन, मातीचे वहन, डोंगरकड्यावरून खडक कोसळणे असे अनेक प्रकार भूस्खलनाचे असतात.

भूस्खलन होण्याची कारणे(Landslide)

भूस्खलन होण्यामागे पाण्याचे कार्य सर्वात महत्त्वाचे आहे. जेव्हा जमिनीत पाणी मुरले जाते त्यावेळी ते मातीच्या कणांमध्ये घर्षण कमी करते. यामुळे जमिनीत छिद्रीय बल निर्माण होते. यामुळेच जमिनीची दाब झेलण्याची क्षमता कमी होत याते. यामुळेच भूस्खलन (Landslide) होते. भूगर्भातील काही रचनाही भूस्खलन होण्यासाठी कारणीभूत ठरतात. अनेक वेळा ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे देखील भूस्खलनसारख्या घटना घडतात. तसेच, मानवी कारणांमुळे भूस्खलन होत असते. अती खोदकाम, वृक्षतोड, डोंगरांवरील बांधकाम अशा अनेक कारणांमुळे भूस्खलन होते.

भूस्खलन थांबविण्याचे उपाय-

भूस्खलन थांबविण्यासाठी नैसर्गिक आपत्ती निर्माण करणाऱ्या गोष्टी थांबवणे सर्वात महत्त्वाचा आहे. तसेच जमिनीतील अतिरिक्त पाणी काढून टाकणं भूस्खलन (Landslide) थांबविण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर, डोंगराच्या उतारांवर संरक्षक भिंती बांधणे हा एक भूस्खलन थांबवण्याचा उपाय आहे. खडकांचे बोल्टिंग केल्यानंतर देखील भूस्खलन रोखण्यास मदत होईल. महत्वाचे म्हणजे, वनीकरणामुळे भूस्खलन थांबविणे सहज शक्य होऊ शकते. मानवाने जर वृक्षतोड कमी केली तर त्यामुळे भूस्खलन (Landslide) थांबू शकते.