Laptop 14 Inch Screen : अगदी स्वस्तात मिळतायत 14 इंचाचे ‘हे’ लॅपटॉप; Amazon वर सुरु आहे सेल

Laptop 14 Inch Screen । शिक्षणासाठी तसेच ऑफिशियल कामांसाठी Laptop ची गरज भासत असते. त्यानुसार मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे लॅपटॉप उपलब्ध आहेत. परंतु या लॅपटॉपच्या किमती महाग असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या किमती परवडणाऱ्या नसतात. त्यामुळे बरेच जण सेकंड हॅन्ड लॅपटॉप घेण्याचा विचार करतात. तुम्ही देखील तुमच्या बजेटनुसार लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सेकंड हॅन्ड ऑप्शन पेक्षा तुम्ही अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलचा ऑप्शन निवडू शकतात. कारण अमेझॉनच्या या फेस्टिवल सेलमध्ये 14 इंच वाल्या लॅपटॉप वर (Laptop 14 Inch Screen) बंपर डिस्काउंट ऑफर करण्यात येत आहे. यासोबतच  Acer , Dell , HP यासारख्या ब्रांचे लॅपटॉप देखील तुम्ही घरी कमी किमतीमध्ये घेऊन येऊ शकतात. यासोबतच बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि EMI ऑफर देखील या सेलमध्ये उपलब्ध आहे. जेणेकरून तुम्ही  कमी किमतीमध्ये ब्रँडेड लॅपटॉप खरेदी करू शकतात. जाणून घेऊया काय आहेत या ऑफर्स.

   

१) Acer One 14

Acer कंपनीच्या या लॅपटॉपमध्ये 14 इंच HD डिस्प्ले (Laptop 14 Inch Screen) देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1366×768 पिक्सल रिझोल्युशन ऑफर करतो. यामध्ये windows 11 सोबतच AMD Ryzen 3 3250U प्रोसेसर देण्यात आले आहे. त्याचबरोबर लॅपटॉपमध्ये  ग्राफिक्स साठी AMD Radeon उपलब्ध आहे. या लॅपटॉप मध्ये उपलब्ध असलेल्या स्टोरेज बद्दल बोलायचं झालं तर, 8 GB रॅम आणि 512 GB इंटरनल स्टोरेज यात देण्यात आले आहे. अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये या लॅपटॉप वर बंपर डिस्काउंट ऑफर करण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही लॅपटॉप 1250 रुपयांच्या डिस्काउंट सह खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला 1212 रुपयाच्या EMI ऑप्शन वर देखील हा लॅपटॉप खरेदी करता येऊ शकतो.

२) HP Chromebook X360– Laptop 14 Inch Screen

HP Chromebook X360 या क्रोमबुक मध्ये 14 इंच चा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले intel Celeron N4120 प्रोसेसर वर काम करतो. या क्रोम बुक मध्ये 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज देण्यात आले आहे. या स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 22,990 आहे. यासोबतच लॅपटॉप मध्ये 47 W बॅटरी उपलब्ध असून 720p HD कॅमेरा देण्यात आला आहे. अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल मध्ये या लॅपटॉप वर बँक ऑफर आणि EMI ऑफर उपलब्ध आहे. त्यानुसार तुम्ही हा लॅपटॉप ICICI बँकेच्या कार्ड वरून खरेदी करणार असाल तर तुम्हाला 3000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. आणि 1,115 रुपयांचा EMI देखील उपलब्ध आहे.

३) Dell Smartchoice 14 Laptop

Dell Smartchoice 14 Laptop मध्ये 14 इंच FHD डिस्प्ले (Laptop 14 Inch Screen) उपलब्ध आहे. यामध्ये 12th Gen Intel Core i5 1235U प्रोसेसर वापरण्यात आले आहे. हे लॅपटॉप 8 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. या लॅपटॉप मध्ये कनेक्टिव्हिटी साठी USB टाईप ची पोर्ट, डिस्प्ले पोर्ट  1.4, USB 3.2 GEN 1 पोर्ट, USB 2.0 पोर्ट, HEADSET JACK, HDMI 1.4 पोर्ट हे फीचर्स उपलब्ध आहे. अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये  Dell Smartchoice 14 Laptop या लॅपटॉप खरेदीवर  डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही हा लॅपटॉप  ICICI बँकेच्या कार्ड वरून खरेदी करणार असाल तर तुम्हाला 3000 रुपयांची सूट मिळू शकते. यासोबतच 2424 रुपयांचा EMI देखील उपलब्ध आहे.