टाइम्स मराठी । बऱ्याचदा काम करत असताना लॅपटॉपमध्ये (Laptop)बरेच प्रॉब्लेम्स येतात. काही वेळेस बॅटरी बॅकअप (Battery Backup) कमी मिळत असल्यामुळे आपल्याला काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. एवढेच नाही तर लॅपटॉप चार्जिंगला (Laptop Charge) लावून देखील लॅपटॉपची बॅटरी चार्ज होत नाही. त्यामुळे पेंडिंग असलेले कामे अडकतात. कधी कधी आपण काम करत असताना लॅपटॉपची बॅटरी संपली असा मेसेज येतो. आणि लॅपटॉप बंद होतो. लॅपटॉप मध्ये चार्जिंग नसेल किंवा चार्ज करून देखील पुन्हा लॅपटॉपची बॅटरी संपली असेल तर आपल्याला लॅपटॉप रिपेअर करावा लागतो आणि त्यामध्ये हजार दोन हजार रुपये खर्च येतो. परंतु अशा परिस्थितीत घाबरून जाऊ नका. आम्ही आज तुम्हाला लॅपटॉप चार्जिंग होत नसेल तर कोणते उपाय कामी येऊ शकतात हे सांगणार आहोत.
1) चार्जिंगची केबल चेक करा
जर तुमचा लॅपटॉप चार्ज होत नसेल तर सर्वात पहिले तुमच्या चार्जिंग ची केबल चेक करा. जर तुमच्या चार्जिंग केबल ला कोणतेही निशाण किंवा कट लागलेला असेल तर तुम्हाला ती वायर बदलावी लागेल. आणि याचा अर्थ लॅपटॉप मध्ये काहीच झालेल नाही फक्त चार्जिंगची केबल खराब झाली आहे.
2) चार्जिंगचा डॉक चेक करा
जर तुमचा लॅपटॉप चार्ज होत नसेल तर सर्वात आधी चार्जिंगचा डॉक चेक करा. या चार्जिंग च्या डॉक मध्ये धूळ माती जमा झाली असेल तर त्याची साफसफाई करा. बऱ्याचदा चार्जिंग पॉईंट मध्ये कार्बन लागलेले असल्यामुळे चार्जिंग होत नाही.
3) ऍडॉप्टर चेक करा
तुमच्या लॅपटॉपचे ऍडॉप्टर आणि चार्जर दोन्ही काढून पुन्हा एकदा चेक करा. आणि परत लावा. परत चार्जिंगला लावल्यानंतर कनेक्टेड बट नॉट चार्जिंग असं नोटिफिकेशन बघायला मिळेल. त्यावेळी तुमचे अडॉप्टर चेंज करून तुम्ही चार्ज होत आहे की नाही हे चेक करू शकतात. बऱ्याचदा कमी वॉल्टचे चार्जर लावलेले असल्यामुळे लॅपटॉप चार्ज होत नाही. जर तुम्ही 45W चार्जर ने लॅपटॉप चार्ज करत असाल तर 90 W चार्जर ने लॅपटॉप चार्ज करून बघा.
4) बॅटरी
जर तुमचा लॅपटॉप पूर्णपणे चार्ज होत नसेल तर एकदा तुमच्या लॅपटॉपची बॅटरी चेक करा. बॅटरी ओवर हीट झाल्यामुळे देखील प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याचबरोबर फिटिंग प्रॉब्लेम देखील असू शकतो. अशावेळी तुम्ही लॅपटॉप मधील बॅटरी काढून पुन्हा लावू शकतात. आणि त्यानंतर लॅपटॉप चार्जिंग करा.
5) बॅटरी अपडेट
बऱ्याच वेळा तुमच्या लॅपटॉपचा ड्राइव अपडेट नसल्यामुळे बॅटरीच्या रिलेटेड समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे लॅपटॉप मध्ये असलेले सर्व ड्राइव्ह अपडेट करत रहा. स्पेशली कनेक्टिव्हिटी आणि बॅटरी ड्राईव्ह अपडेट करणे अत्यंत गरजेचे आहे. ड्राईव्ह अपडेट करण्यासाठी सर्वात अगोदर स्टार्ट मेन्यू वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला बॅटरी सेक्शन ऑप्शन मिळेल. या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर Microsoft ACPI control Method Battery हे ऑप्शन मिळेल. या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर बॅटरी ड्राईव्ह अपडेट होईल.