टाइम्स मराठी । मित्रानो, मोबाईल प्रमाणेच लॅपटॉप (Laptop) हा सुद्धा आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. नोकरदार वर्ग लॅपटॉपवरूनच आपली कामे करत असतात तसेच आजकाल शाळेतील मुलेही लॅपटॉप वरून अभ्यास करत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. त्यामुळे लॅपटॉपची महत्व वेगळं आहे. परंतु ज्याप्रमाणे एखाद्या इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर वाढतो, त्यानुसार कधी कधी त्यामध्ये आपल्याला काही समस्याही येतात. आजकाल लॅपटॉप गरम होण्याचे प्रमाण वाढलं आहे. कधी कधी तर थोडा वेळ जरी लॅपटॉप सुरु ठेवला तरी तो गरम होतो. परंतु अशा गोष्टीकडे कधी दुर्लक्ष्य करू नका.
खरं तर, लॅपटॉप गरम (Laptop Over Heated) होण्यामागे अनेक कारणे आहेत. लॅपटॉप जर जास्तच गरम झाला तर तो खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लॅपटॉप गरम होण्यामागील काही कारणे सांगणार आहोत. तसेच यावर मात करण्यासाठी नेमक्या काय काय उपाययोजना करायला हव्यात याबाबत सुद्धा अगदी थोडक्यात सांगणार आहोत. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
लॅपटॉप गरम होण्यामागची कारणे –
चार्जिंग लावून लॅपटॉपवर तुम्ही काम करत बसलात तर तुमचा लॅपटॉप अगदी थोड्या वेळातच गरम होऊ शकतो.
लॅपटॉपमध्ये साचलेली धूळ आणि घाण हवेचा प्रवाह रोखू शकते, ज्यामुळे लॅपटॉप जास्त गरम होऊ शकतो.
जर तुमच्या लॅपटॉपचा पंखा खराब झाला असेल तरी सुद्धा तो गरम राहण्याची शक्यता असते.
कधी कधी आपण सलग ८ ते १० तास लॅपटॉप वापरतो. त्यामुळे त्यावर अतिरिक्त लोड येऊन तो गरम होऊ शकतो.
काय उपाययोजना कराव्यात –
जर तुम्हाला लॅपटॉप जास्त गरम होण्यापासून वाचवायचा असेल तर त्याखाली कूलिंग पॅड वापरा. तसेच, लॅपटॉपवर धूळ बसून देऊ नका. लॅपटॉपची बाहेरील बाजू आणि स्क्रिन नेहमी स्वच्छ ठेवा. तसेच ते अँप वापरात नाहीत ते डिलीट करून टाका. असं केल्यास तुमचा लॅपटॉप लवकर गरम होणार नाही.