Laptops Under 20000 : 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ लॅपटॉप

Laptops Under 20000 : आजकाल ऑफिशियल तसेच पर्सनल कामांसाठी प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचा लॅपटॉप असतो. मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे लॅपटॉप आणि टॅबलेट उपलब्ध आहेत. गेम लव्हर साठी देखील बरेच लॅपटॉप उपलब्ध असल्याचे आपल्याला दिसून येतं. तुम्ही देखील या दिवसांमध्ये लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु बजेट कमी असेल तर आम्ही तुम्हाला 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या लॅपटॉप बद्दल सांगणार आहोत, जे की कमी किमतीमध्ये अप्रतिम परफॉर्मन्स देतात.

   
Chuwi HeroBook Pro

१) Chuwi HeroBook Pro-

तुम्ही कमी किमतीमध्ये लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, Chuwi HeroBook Pro हा लॅपटॉप तुम्ही 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत (Laptops Under 20000) खरेदी करू शकतात. या लॅपटॉपवर अमेझॉन वर 46% डिस्काउंट  ऑफर करण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही हा लॅपटॉप 18,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. या Chuwi HeroBook Pro  लॅपटॉप मध्ये p14.1” स्क्रीन मिळते. यासोबतच 8 GB रॅम आणि इंटरनल स्टोरेज 1 TB SSD पर्यंत वाढवता येऊ शकते. या लॅपटॉप मध्ये 2.8 गीगाहर्ट्झ स्पीड असलेले इंटेल सेलेरॉन N4020 प्रोसेसर देण्यात आला आहे. म्हणजेच तुम्ही लॅपटॉपच्या माध्यमातून तुमची सर्व कामे स्पीडमध्ये करू शकता.

HP 255 G9 840T7PA

२) HP 255 G9 (840T7PA) Notebook-

Hp कंपनीचे लॅपटॉप हे मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. त्यानुसार तुम्ही HP कंपनीचा HP 255 G9 (840T7PA) नोटपॅड 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी (Laptops Under 20000) करू शकतात. या लॅपटॉपमध्ये 15.6-इंच स्क्रीन देण्यात आली आहे. ही स्क्रीन व्हिडिओ यासह गेमिंगसाठी गेम-चेंजर ठरते. यामध्ये 4GB रॅम आणि 256 GB SSD स्टोरेज मिळते. Hp कंपनीच्या या लॅपटॉपच्या माध्यमातून मल्टी टास्किंग करणे सोपे जाते. हा लॅपटॉप लाइटनिंग-फास्ट परफॉर्मन्स देतो. या लॅपटॉप मध्ये देण्यात आलेली स्टोरेज कॅपॅसिटी ही फाईल्स, फोटो आणि व्हिडिओ साठवण्यासाठी कमी आहे.

lenovo e41 55 82fj00

३) Lenovo E41-55- Laptops Under 20000

Lenovo E41-55 या लॅपटॉप वर 74% पर्यंत सूट मिळत आहे. म्हणजेच तुम्ही हा लॅपटॉप फक्त 20,690 रुपयांना खरेदी करू शकता. या लॅपटॉपमध्ये AMD Athlon A3050U प्रोसेसर देण्यात आला आहे. हा लॅपटॉप 4GB रॅम आणि 256GB SSD स्टोरेज मध्ये उपलब्ध असून खास करून विद्यार्थी किंवा गेमिंग लव्हर साठी स्पेशल आहे.