Lava Blaze 2 5G : Lava ने लाँच केला स्वस्तात मस्त 5G मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये LAVA या ब्रँडचे वेगवेगळे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. त्यातच आता कंपनीने आणखीन एक मोबाईल मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये कंपनीने  Lava Blaze 2 हा 4G स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनीने हाच मोबाईल 5G मध्ये आणला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन उपलब्ध केले असून दोन स्टोरेज व्हेरियंट यामध्ये मिळतात. तुम्ही हा मोबाईल ग्लास ब्लॅक, ग्लास ब्लू, ग्लास लवेंडर कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता. आज आपण जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन .

   

स्पेसिफिकेशन

Lava Blaze 2 5G मध्ये कंपनीने पंचहोल डिझाईन मध्ये 6.56 इंच चा HD + IPS  2.5D CURVED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 hz रिफ्रेश रेट सह येतो. स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6020 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर काम करतो. कंपनीने मोबाईल मध्ये 5000 mAh क हि दमदार बॅटरी दिली असून ही बॅटरी 18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा- Lava Blaze 2 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनलवर 50 MP रियर कॅमेरा आणि 8 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा सोबत LED फ्लॅश देखील उपलब्ध आहे. तुम्हाला हा मोबाईल 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये मिळतो. हे स्टोरेज SD कार्डच्या माध्यमातून वाढवता देखील येऊ शकते.

फिचर्स

Lava Blaze 2 5G या मोबाईल मध्ये Type C पोर्ट चार्जर, Wifi, 5G सपोर्ट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, फिंगरप्रिंट सेंसर, फेस अनलॉक, बॅटरी सेवर मोड  यासारखे बरेच फीचर्स उपलब्ध आहेत.

किंमत किती?

Lava Blaze 2 5G हा स्मार्टफोन  कंपनीने ३ कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे. या मोबाईलच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर, 4GB रॅम आणि 63 GB स्टोरेज व्हेरियंट ची किंमत 9,999 ठेवण्यात आली आहे. यासोबतच 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 एवढी आहे. तुम्ही देखील हा स्मार्टफोन दिवाळी निमित्त खरेदी करण्याचा विचार करत असाल तर  9 नोव्हेंबर पासून Lava रिटेल आणि Amazon India वर उपलब्ध होणार आहे.