Lava Blaze Pro 5G : उद्या LAVA लाँच करणार धमाकेदार Mobile; काय फीचर्स मिळणार पहा

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल कंपनी LAVA भारतीय बाजारपेठेमध्ये उद्या Lava Blaze Pro 5G हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. LAVA कंपनीचा हा 5G व्हेरिएंट मोबाईल असणार आहे. कंपनीने एक टीझर लाँच करत या स्मार्टफोनच्या लॉन्चिंग डेट बद्दल माहिती दिली. त्यानुसार हा स्मार्टफोन उद्या म्हणजेच 26 सप्टेंबरला मार्केटमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. टीझर व्हिडिओमध्ये या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन आणि डिझाईनचा खुलासा करण्यात आला आहे. आज आपण जाणून घेऊयात LAVA च्या या मोबाईल मध्ये नेमक्या काय खास गोष्टी असणार आहेत

   

6.5 इंच डिस्प्ले –

Lava Blaze Pro 5G मध्ये 6.5 इंच HD+ 2.5 D कर्व्ह IPS डिस्प्ले मिळू शकतो. हा डिस्प्ले 90 hz रिफ्रेश रेट आणि 720 ×1600 पिक्सल रिझॉल्युशन सोबत येईल. तसेच या मोबाईल मध्ये मीडियाटेक डायमेनसिटी 6020 SoC प्रोसेसर देण्यात येण्याची शक्यता आहे. Lava चा हा स्मार्टफोन ऑक्टाकोर मीडियाटेक हिलिओ G37 SOC या ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करेल असं सांगण्यात आलं आहे.

कॅमेरा – Lava Blaze Pro 5G

मोबाईलच्या कॅमेरा बाबत सांगायचं झाल्यास, Lava Blaze Pro 5G या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश देण्यात येऊ शकते. हा कॅमेरा सेटअप गोलाकार कॅमेरा मॉडेल मध्ये कंपनीकडून देण्यात येणार आहे. त्यापैकी प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल एवढा असेल. लावा कंपनीकडून हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. यामध्ये ब्लॅक आणि ऑफ व्हाईट शेड या २ रंगांचा पर्याय आहे.

बाकी अन्य फीचर्स बाबत बोलायचं झाल्यास, Lava Blaze Pro 5G मध्ये 3.5 mm ऑडिओ जॅक, मायक्रोफोन, यूएसबी टाइप सी पोर्ट, स्पीकर ग्रील यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स यामध्ये देण्यात येऊ शकतात. तसेच हा मोबाईल 15,000 रुपयांमध्ये लॉन्च करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.