LAVA लवकरच लाँच करणार परवडणारा Mobile; 50 MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी अन बरंच काही

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल कंपनी असलेल्या LAVA ने भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. लॉन्चिंग पूर्वी कंपनीचे प्रमुख बिझनेस हेड सुनील रैना यांनी याबाबत माहिती दिली. या अपकमिंग स्मार्टफोनचे नाव LAVA BLAZE PRO 5G असं आहे. हा मोबाईल म्हणजे मागच्या वर्षी भारतात लॉन्च झालेल्या LAVA BLAZE PRO चे अपडेटेड वर्जन आहे. या मोबाईल मध्ये नेमक्या काय खास गोष्टी असतील हे आज आपण जाणून घेणार आहोत.

   

स्पेसिफिकेशन

LAVA BLAZE PRO 5G या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 91 HZ रिफ्रेश रेट सह येतो. यामध्ये मीडियाटेक डायमनसिटी 6020 प्रोसेसर देण्यात आले आहे. तसेच मोबाईल मध्ये 5000 mAh बॅटरी यामध्ये उपलब्ध करण्यात येणार असून ही बॅटरी 18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. LAVA BLAZE PRO 5G या स्मार्टफोनचा फोटो कंपनीकडून शेअर करण्यात आला. यामध्ये पाठीमागील बाजूने बॅक पॅनलवर ग्रेडियंट डिझाईन देण्यात आले आहे. हे डिझाईन व्हाईट किंवा सिल्वर कलर ऑप्शन मध्ये दिसत असून या फोटोमध्ये एक बॉक्सी फॉर्म फॅक्टर आणि दोन रिंग दिसत आहे.

कॅमेरा

LAVA BLAZE PRO 5G या अपकमिंग स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश कॅमेरा उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळेल.हा स्मार्टफोन सप्टेंबर महिन्याचा अखेरीस लॉन्च करण्यात येऊ शकतो. सर्वात महत्वाचे म्हणजे हा स्मार्टफोन कंपनी 16 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत लॉन्च करू शकते.