LAVA ने फक्त 6,999 रुपयात आणला दमदार स्मार्टफोन; पहा काय आहेत फीचर्स?

टाइम्स मराठी । इंडियन स्मार्टफोन कंपनी LAVA ने भारतामध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. LAVA Yuva 2 असं या स्मार्टफोनचं नाव असून हा स्मार्टफोन बजेट प्राईज सेगमेंट मध्ये सादर करण्यात येणार आहे. या मोबाईल ची किंमत फक्त 6,999 रुपये आहे. तुम्ही हा स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता तसेच वॉरंटी पिरियड मध्ये खराब झाल्यास घरीच रिपेअर केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये ग्लास ब्ल्यू, ग्लास लव्हेंडर, ग्लास ग्रीन हे कलर उपलब्ध आहेत.

   

काय आहेत फीचर्स –

LAVA Yuva 2 या स्मार्टफोनमध्ये सिंक डिस्प्ले देण्यात आलेला असून 90 hz रिफ्रेश रेट मध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर हा सिंक डिस्प्ले फिलासफी हाय स्क्रीन टू बॉडी रेशो आणि लो बेजल्स वर फोकस्ड आहे. हा स्मार्टफोन प्रीमियम ग्लास फिनिशिंग सह उपलब्ध असून यामध्ये Unisoc T606 octa core प्रोसेसर चिपसेट सह देण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये 3 जीबी फिजिकल रॅम आणि 3 जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्ट उपलब्ध असून पूर्णपणे 6 जीबी रॅम मिळेल. यासह 64 जीबी व्हर्च्युअल स्टोरेज देखील यामध्ये देण्यात आले आहे.

कॅमेरा –

LAVA Yuva 2 या स्मार्टफोनमध्ये रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असून रियर पॅनल मध्ये एलईडी फ्लॅश लाईट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये प्रायमरी कॅमेरा हा 13 MP, सेकंडरी ए आय कॅमेरा देखील उपलब्ध आहे. यासह सेल्फी आणि विडिओ कॉल साठीसाठी 5 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर साईडला फिंगरप्रिंट स्कॅनर, ॲनॉनिमस ऑटो कॉल रेकॉर्डिंग, नॉईस कॅन्सलेशन साठी ड्युअल मायक्रोफोन यासारखे फीचर्स उपलब्ध आहे.

LAVA Yuva 2 हा स्मार्टफोन Android 12 वर काम करतो. यामध्ये युजर साठी क्लीन आणि boatware free अँड्रॉइड एक्सपिरीयन्स देण्यात आलेला असून या स्मार्टफोनमध्ये Android 13 अपडेट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर हा स्मार्टफोन अवघ्या 6999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. आज पासून हा स्मार्टफोन लावाच्या रिटेल नेटवर्कवर उपलब्ध करण्यात येणार आहे.