Lava Yuva 3 : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Lava ने भारतीय बाजारात एक नवीन परवडणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. Lava Yuva 3 असे या मोबाईलचे नाव आहे. या मोबाईलची किंमत अतिशय कमी असून यामध्ये कंपनीने अनेक खास फीचर्स दिले आहेत. जे ग्राहक कमी पैशात मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असतात त्यांच्यासाठी Lava चा हा मोबाईल अतिशय बेस्ट पर्याय ठरेल. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, त्याची कॅमेरा क्वालिटी, बॅटरी आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
6.5 इंचाचा डिस्प्ले –
Lava Yuva 3 मध्ये कंपनीने 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा HD+ पंच होल डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेला 720*1600 पिक्सेल रिझोल्यूशन मिळतो. Lava च्या या मोबाईल मध्ये UNISOC T606 ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला असून हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर वर्क करतो. Lava Yuva 3 मध्ये 4GB रॅम देण्यात आली आहे आणि व्हर्चुअल रॅमद्वारे ८GB पर्यंत वाढवता येते. तर 128GB इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. microSD कार्डद्वारे हे स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येते.
कॅमेरा – Lava Yuva 3
मोबाईलच्या कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचं झाल्यास, Lava Yuva 3 मध्ये 13 मेगापिक्सलचा ट्रिपल AI रियर कॅमेरा आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. अन्य फीचर्सबाबत बोलायचं झाल्यास, Lava Yuva 3 मध्ये प्रीमियम बॅक डिझाइनसह साइड फिंगरप्रिंट सेन्सर, 4G, Wi-Fi 802.11 b/g/n/ac, USB टाइप C पोर्ट, ब्लूटूथ V5.0 आणि ऑडिओ जॅक 3.5mm समाविष्ट आहे.
किंमत किती??
मोबाईलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Lava Yuva 3 च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,799 रुपये आहे आणि 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,299 रुपये आहे. हा स्मार्टफोन 7 फेब्रुवारीपासून ई-कॉमर्स साइट Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तुम्ही हा मोबाईल काळा, लव्हेंडर आणि पांढऱ्या रंगात खरेदी करू शकता.