50 MP कॅमेरासह Lava Yuva 3 Pro मोबाईल लाँच; पहा किंमत किती?

टाइम्स मराठी । इंडियन स्मार्टफोन कंपनी LAVA ने नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. लॉन्च करण्यात आलेल्या या स्मार्टफोनचे नाव Yuva 3 Pro असून कंपनीने हा मोबाईल 9000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत लॉन्च केला आहे. LAVA कंपनीचा हा स्मार्टफोन प्रीमियम ग्लास बॅक पॅनल सह येतो. आज आपण जाणून घेऊया या मोबाईलचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

50 MP कॅमेरा-

Lava Yuva 3 Pro मध्ये 6.5 इंच hd+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1600 × 720 पिक्सल रिझोल्युशन ऑफर करतो. यासोबतच 90 hz रिफ्रेश रेट आणि 269 ppi देखील यामध्ये मिळत आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये ऑक्टा कोर Unisoc T616 चीपसेट बसवली आहे. Lava कंपनीचा हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर काम करतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 50 MP प्रायमरी कॅमेरा सोबतच सेकंडरी सेन्सर आणि LED फ्लॅश उपलब्ध करण्यात आला आहे. यासोबतच सेल्फी साठी स्क्रीन फ्लॅश सह 8 MP फ्रंट कॅमेरा मिळेल. कंपनीने या कॅमेरा सोबतच AI फीचर सपोर्ट देखिल उपलब्ध केले आहे. एवढेच नाही तर कॅमेरा ब्युटी, HDR , नाईट, पोट्रेट , AI, pro, टाईमलॅप्स यासारखे फीचर्स देखील मिळतील.

5000 mAh बॅटरी-

Lava Yuva 3 Pro या मोबाईलमध्ये कंपनीने 5000 mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज मिळते. हे स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येईल. या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या कनेक्टिव्हिटी फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट, 18W चार्जर , वाय-फाय , ब्लूटूथ, हेडफोन जॅक आणि सिक्युरिटी साठी फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. कंपनीने 2 वर्षांपर्यंत सेक्युरिटी अपडेट देणार असल्याचा दावा केला आहे.

किंमत किती?

या स्मार्टफोनमध्ये डेझर्ट गोल्ड, फॉरेस्ट विरिडियन आणि मिडो पर्पल कलर ऑप्शन देण्यात आले आहेत. मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरीएंटची किंमत 8999 रुपये आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना वॉरंटी पिरियड दरम्यान फ्री होम सर्विस देखील ऑफर केली आहे. त्यानुसार हा मोबाईल 2 वर्षांपर्यंत खराब झाल्यास डोअर स्टेप सर्विस मिळेल.