Lava Yuva 5G : स्वस्तात मस्त 5G मोबाईल लाँच; किंमत फक्त 9,499 रुपये

टाइम्स मराठी । प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक ब्रँड लावा ने आपला Lava Yuva 5G मोबाईल लाँच केला आहे. सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा कमी किमतीत हा मोबाईल बाजारात दाखल झाला आहे. यामध्ये ग्राहकांना 4GB रॅम, 50MP सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. 5 जून रोजी दुपारी 12 वाजता या मोबाईलची विक्री सुरु होणार आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

   

6.5-इंचाचा डिस्प्ले –

या स्मार्टफोनची लांबी 163.36 मिमी, रुंदी 76.16 मिमी, जाडी 9.1 मिमी आणि वजन 208 ग्रॅम आहे. Lava Yuva 5G स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720*1600 पिक्सल रिझोल्युशन सह येतो. कंपनीने मोबाईलमध्ये UNISOC T750 5G प्रोसेसर बसवला असून लावाचा हा स्मार्टफोन Android 13 OS ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये GPRS, 4G, 5G, Wi-Fi, USB Type C पोर्ट, GLONASS, Bluetooth V5.0, 3.5mm ऑडिओ जॅक आणि OTG सपोर्ट यांचा समावेश आहे.

कॅमेरा – Lava Yuva 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायच झाल्यास, Lava Yuva 5G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यामध्ये 50MP मुख्य सेन्सर आणि 2MP सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी मोबाईलमध्ये 5,000 mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 18W चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Lava Yuva 5G च्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे तर 4GB + 128GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन निळ्या आणि हिरव्या रंगात उपलब्ध असून देशातील प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon India, Lava e-store आणि Lava रिटेल आउटलेट्सच्या माध्यमातून तुम्ही खरेदी करू शकता.