LCD, OLED की AMOLED? कोणता डिस्प्ले आहे बेस्ट? पहा संपूर्ण माहिती

टाइम्स मराठी । आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जात असताना त्यामध्ये असलेली रॅम, प्रोसेसर याबद्दल माहिती घेतो. परंतु यामध्ये कोणत्या प्रकारचा डिस्प्ले लावण्यात आलेला आहे याबद्दल जास्त माहिती आपल्याला नसते. किंवा स्मार्टफोन दुकानदाराने आपल्याला LED, AMOLED, OLED डिस्प्ले असल्याचं सांगितलं तरी यातील फरक आपल्याला माहीत नसते. आज-काल बाजारामध्ये स्मार्टफोन मध्ये तीनही डिस्प्ले मिळतात. पण या तिघांमधला फरक काय हे आपण जाणून घेणार आहे.

   

स्मार्टफोन मध्ये प्रोसेसर आणि डिस्प्ले हे मुख्य घटक मानले जातात. स्क्रीन कॉलिटी आणि पिक्सेल रिझोल्युशन एकमेकांशी निगडित असतात. परंतु पिक्सेल मध्ये वापरण्यात येणारी टेक्नॉलॉजी समजण्यासाठी अत्यंत अवघड आहे. त्याच प्रकारे स्मार्टफोन मध्ये दोन पिकनिक दिल्या जातात. यामध्ये पहिली AMOLED आणि दुसरी LCD. या दोन्ही स्क्रीन डिस्प्ले मध्ये फरक आहे.

1) AMOLED डिस्प्ले

AMOLED डिस्प्ले चा फुल फॉर्म ॲक्टिव मॅक्ट्रिक्स ओर्गेनिक लाईट एमीटिंग ( Active matrix organic Light Emitting Diode) आहे. AMOLED हा डिस्प्ले टेलिव्हिजन मध्ये वापरण्यात येणाऱ्या OLED डिस्प्ले टेक्नॉलॉजीचा भाग आहे. या AMOLED मधील OLED डिस्प्ले मध्ये कलर रिप्रोडक्शन, चांगली बॅटरी लाईफ, हाय ब्राईटनेस, शार्पनेस सह TFT म्हणजे थिन फिल्म ट्रांजिस्टर हे फीचर्स असतात. या थिन फिल्म ट्रांजिस्टर मुळे योग्य दिशेने पिक्सल पाठवण्याची प्रक्रिया सुरळीत होते.

2) LCD डिस्प्ले

LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. हा डिस्प्ले टीव्ही, कम्प्युटरसारख्या बऱ्याच उपकरणांमध्ये वापरण्यात येतो. त्याचबरोबर LCD स्क्रीनवर पिक्सेलला लाईट मिळावा यासाठी बॅकलाईट चा वापर केला जातो. यासाठी हा बॅकलाईट लिक्विड क्रिस्टल च्या माध्यमातून चमकतो. या क्रिस्टल ची मांडणी प्रत्येक पिक्सल मधून जाणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण ठरवत असते. त्यामुळे स्मार्टफोनच्या स्क्रीनवर चित्र तयार होतात.

3) OLED डिस्प्ले

OLED डिस्प्ले हा हलका आणि फ्लेक्सिबल असतो. त्याचबरोबर याची किंमत देखील जास्त असते. OLED डिस्प्ले चा फुल फॉर्म, ऑरगॅनिक लाईट लिमिटेड डिओड हा आहे. या डिस्प्ले साठी LCD प्रमाणे बॅक लाईट गरजेचा नसतो. पिक्सेल ऑन झाल्यानंतर OLED स्वतःचा लाईट देतो. आणि पिक्चर बंद झाल्यावर कोणताच लाईट एमिट होत नाही. हा डिस्प्ले कॉन्ट्रास्ट, जास्त व्हाईब्रेन्ट आणि डिप्पर ब्लॅक कलर देतो. एलसीडी च्या तुलनेमध्ये हा डिस्प्ले उत्कृष्ट आहे. त्याचबरोबर AMOLED आणि OLED या डिस्प्ले ची तुलना केल्यास AMOLED डिस्प्ले अप्रतिम मानला जातो. कारण AMOLED या डिस्प्ले मध्ये प्रत्येक पिक्सेल ला टर्न ऑन आणि ऑफ करण्याची क्षमता आहे. तर OLED या डिस्प्ले ला रो वाईज पिक्सल कंट्रोल करतो.