हर हर महादेव!! 12 ज्योतिर्लिंगापैकी ‘या’ 5 ज्योतिर्लिंगाबद्दल जाणून घ्या

टाइम्स मराठी । भारत हा देश धार्मिक आणि पवित्र मंदिरांनी वेढलेला देश आहे. या ठिकाणी बरेच प्राचीन आणि पवित्र मंदिरे देखील आहे. भारतामध्ये महादेवाची पूजा करणारे बरेच भक्त आहेत. महादेव भगवान शंकर भक्ती केल्यावर लवकर प्रसन्न होतात. यामुळे भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये महिलांची संख्या अफाट दिसते. महादेव मंदिराज शिवालयांमध्ये प्रत्येक वर्षी लाखो च्या संख्येने वेगवेगळ्या शहरातून भाविक येत असतात. भारतामध्ये महादेवाची बारा ज्योतिर्लिंग आहेत. या बारा ज्योतिर्लिंगांबाबत हिंदू धर्मातील पुराणांमध्ये सांगण्यात आलं आहे की, ज्या ठिकाणी शिव स्वतः प्रकट झाले त्या ठिकाणी हे ज्योतिर्लिंग स्थापन करण्यात आले आहे. या ज्योतिर्लिंगा बाबत शिवपूर्णांमध्ये कथा देखील सांगण्यात आले आहेत. त्याचबरोबर या ज्योतिर्लिंगाचे महत्त्व देखील प्रचंड आहे. बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक शहरातून भाविक येत असतात. हे ज्योतिर्लिंग काही महाराष्ट्रामध्ये तर काही मध्य प्रदेश यासारख्या वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थापित झाले आहे. परंतु महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशांमध्ये सर्वात जास्त ज्योतिर्लिंग आहेत. तर जाणून घेऊया या बारा ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंगांची माहिती आणि हे ज्योतिर्लिंग वसलेल्या शहरांची नावे.

   
Shri Kshetra Somnath

1) श्री क्षेत्र सोमनाथ

हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग आहे. गुजरात मध्ये असलेल्या सौराष्ट्र या ठिकाणी वेळच्या जवळ सोमनाथ हे ज्योतिर्लिंग वसलेले आहे. अथांग अरबी समुद्राच्या पार्श्वभूमीवर हे सोमनाथांचे मंदिर अत्यंत आकर्षक आहे. गजनीच्या मेहमूदने आणि बऱ्याच जणांनी या मंदिराला उध्वस्त करण्याचा आणि लुटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पुन्हा एकदा त्याच ताकदीने हे मंदिर उभे आहे. बऱ्याच वेळेस या मंदिराची पुनर्निर्मितीदेखील करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. श्रीक्षेत्र सोमनाथ जवळच त्रिवेणी घाट असून हिरण्य कपिला आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा संगम मंदिराजवळ होतो. या मंदिराच्या इतिहासामध्ये सोमनाथ जवळ पाच पांडवांचे वास्तव्य होते असा इतिहास सांगण्यात येतो.

प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सोम म्हणजे चंद्राने दक्ष राजाच्या 27 कन्यांसोबत विवाह केला होता. परंतु त्यापैकी रोहिणीवर सोमनाथांचे जास्त प्रेम असल्यामुळे इतर कन्यावर अन्याय होत असल्यामुळे दक्ष राजाने सोमनाथांना शाप दिला होता. परंतु चंद्राने शिव शंकराची भक्ती करून या सापाचे निराकरण करून घेतले. त्यामुळे मंदिराचे नाव सोमनाथ असे पडले आहे. चंदाने निर्माण केलेल्या या मंदिराचा ऋग्वेदामध्ये उल्लेख करण्यात आलेला असून हे शिव शंकराचे अत्यंत पवित्र मंदिर मानले जाते.

Srisailam Mallikarjuna Jyotirlinga

2) श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग

हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश राज्यातील दक्षिणेच्या भागांमध्ये श्रीशैलम पर्वतावर कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे. हे अत्यंत प्रसिद्ध ज्योतिर्लिंग असून दक्षिणेचा कैलास या नावाने देखील हे स्थळ ओळखलं जाते. या मंदिराचे नाव माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या नावातून पडले आहे. माता पार्वती म्हणजेच मल्लिका आणि भगवान शिव अर्थात अर्जुन म्हणून या मंदिराला मल्लिकार्जुन नाव देण्यात आले. इतिहासामध्ये सांगण्यात आलं आहे की, हे म्हणजे दुसऱ्या शतकापासून अस्तित्वात आहे. विजयनगर साम्राज्याचा पहिला राजा हरिहर च्या काळातील हे मंदिर असून या ठिकाणी असलेला मुख मंडप देखील त्याच काळात बांधण्यात आला आहे. शिवपुराणानुसार या मंदिराची स्थापना कशा पद्धतीने झाली याची माहिती कार्तिकेय आणि गणपतीसोबत निगडित आहे.

शिवपार्वती पुत्र गणेश आपला मोठा भाऊ कार्तिकेय यांच्या अगोदर लग्न करू इच्छित होते. यावर शिवपार्वतीने युक्ती लढवून दोघांना देखील एक काम दिले. जो पृथ्वीला प्रदक्षिणा पहिले घालून येईल त्यांचे लग्न सर्वात पहिले करण्यात येईल. अशी अट पार्वतीने ठेवली. यावर कार्तिकेने मोरावर बसून पृथ्वीला प्रदक्षिणा घातली . परंतु गणपतीने भगवान शंकर आणि माता पार्वती यांना प्रदक्षिणा घालत आपल्यासाठी पृथ्वी तेच असल्याचं सांगितलं. यावेळी गणपती बाप्पा जिंकले पण कार्तिकेयला हे सहन झाले नाही. त्यानंतर कार्तिकीय पळून गेला. यावेळी कार्तिकेला समजावण्यासाठी पार्वती गेली असता त्या ठिकाणावरून देखील कार्तिकेय निघून गेले. यामुळे पार्वती माता निराश झाली. आणि त्या ठिकाणी शिवशंकर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपामध्ये प्रकट झाले. हे ठिकाण म्हणजेच श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर.

Shri Kshetra Bhimashankar

3) श्रीक्षेत्र भीमाशंकर

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर हे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आलेले आहे. भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगांमधून महाराष्ट्रातील मुख्य नद्यांपैकी एक भीमा नदी उगम पावते. सह्याद्रीच्या प्रमुख रांगेतील हे ठिकाण घनदाट अरण्याने वेढलेले आहे. हेमाडपंती असणारे हे मंदिर सुमारे बाराशे चौदाशे वर्षांपूर्वीचे आहे. कुंभकर्णाच्या पत्नीने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर मुलगा भीमाला देव देवतेंपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. भीमा मोठा झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण त्याला समजले. त्यानंतर देवांचा बदला घ्यायचे त्याने ठरवले. आणि ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली. आणि बालशाही होण्याचे वरदान मागितले. एकदा जात असताना कामारूपेश्वर आला महादेवाची भक्ती करताना पाहून आपली भक्ती करण्यास भीमाने त्याला सांगितले. परंतु यावर राजाने नकार दिल्यामुळे त्याला भीमाने बंदिस्त केले. यावेळी राजाने कारागृहात गेल्यानंतर शिवलिंग तयार करून पूजा करायला सुरुवात केली. परंतु भिमाने रागा तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या ठिकाणावरून महादेव प्रकट झाले.त्यानंतर शिव आणि भीम मध्ये युद्ध झाले. आणि यामध्ये भीमाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राजाने महादेवांना त्याच ठिकाणी वास्तव करण्याची विनंती केली. या ठिकाणी भीमाने युद्ध केल्यामुळे या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले.

Shri Kshetra Trimbakeshwar

4) श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर

हे ज्योतिर्लिंग नाशिक पासून 28 किलोमीटर अंतरावर आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रंबकेश्वर मंदिर वसलेले आहे. या ठिकाणी अत्यंत सुंदर असा परिसर असून प्रचंड भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात. हे जगप्रसिद्ध मंदिर असून पुरातन काळामध्ये याचे बांधकाम करण्यात आले. हे मंदिर कालसर्प पूजेसाठी आणि निधनानंतरच्या विधींसाठी जास्त प्रसिद्ध आहे.

प्राचीन काळामध्ये त्र्यंबक ऋषींची ही तपोभूमी होती. गोहत्या पापातून मुक्ती मिळण्यासाठी गौतम ऋषींनी या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली होती. या तपश्चर्येतून त्यांनी शिवशंकरांकडून गंगा नाशिकला आणण्याचे वरदान मागितले. या वरदानामुळेच गंगा नदीचा म्हणजेच गोदावरी नदीचा या ठिकाणी उगम झाला. गोदावरीच्या उगमासह शिवशंभूने देखील आपल्या वास्तव्यासाठी होकार दिला. या त्र्यंबक ऋषींमुळेच मंदिराला त्र्यंबकेश्वर नाव मिळाले आहे.

Vaidyanath

5) वैद्यनाथ

परळी वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे ठिकाण बीड जिल्ह्यातील परळी या ठिकाणी आहे. हे जागृत देवस्थानापैकी एक असल्याचे मानले जाते. पुरानात सांगितल्याप्रमाणे या मंदिराची स्थापना रावणाद्वारे अकस्मात झाली होती. रावण भगवान शिवशंकरांना शिवलिंगाच्या रूपात स्थापित करण्यासाठी घेऊन जात असताना रस्त्यामध्ये मेरू पर्वतावर शिवलिंग ठेवल्यामुळे भगवान शिव स्वयंभू शिवसिंग स्वरूपात तिथे स्थापित झाले. या मंदिराचा जिर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचं सांगण्यात येतं. बारा ज्योतिर्लिंग पैकी कोणत्याही ज्योतिर्लिंगाला हात लावता येत नाही परंतु परळी वैजनाथ येथे देवाच्या पायाला अर्थात देवाला स्पर्श करून तुम्हाला दर्शन घेता येऊ शकते.