Lectrix LXS 2.0 : बाजारात आली परवडणारी Electric Scooter; 98 KM रेंज

टाइम्स मराठी । गेल्या वर्षभरात भारतात इलेक्ट्रिक गाडयांना मोठी पसंती मिळत आहे. रोज पेट्रोलला पैसे खर्च करण्यापेक्षा इलेक्ट्रिक गाडी खरेदी करून पैशाची बचत करण्याला ग्राहक प्राधान्य देत आहेत. याशिवाय इलेक्ट्रिक गाड्या या दिसायला सुद्धा आकर्षक असल्याने तरुणाईची मोठी पसंती मिळत आहे. बाजारपेठेतील वाढती मागणी पाहता अनेक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी Lectrix EV ने भारतीय बाजारपेठेत नवीन LXS 2.0 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. आकर्षक लूक आणि दमदार फीचर्सने सुसज्ज असलेल्या या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत सुद्धा अगदी परवडणारी आहे. आज आपण या स्कुटरचे खास फीचर्स जाणून घेऊयात …

   

Lectrix LXS 2.0 इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये कंपनीने 2.3 kWh बॅटरी पॅक दिला आहे. तसेच या ई-स्कूटरमध्ये 2.2 kW (2.9 bhp) BLDC हब मोटर आहे. कंपनीचा दावा आहे कि एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल 98 किलोमीटर अंतर आरामात पार करेल. यावेळी तिचे टॉप स्पीड ६० किलोमीटर प्रतितास इतकं राहील. Lectrix LXS 2.0 इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत कंपनीने 79,999 रुपये ठेवली आहे. या स्कुटरची परी बुकिंग आणि डिलिव्हरी मार्च 2024 पासून सुरु होईल. कंपनीचे म्हणंन आहे कि ग्राहकांचा आवश्यक असणाऱ्या रेंज, क्वालिटी आणि किंमत या तिन्ही गोष्टींवर आम्ही खरे उतरलो आहोत.

अन्य फीचर्स – Lectrix LXS 2.0

इतर फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, Lectrix LXS 2.0 इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये 25 लीटर अंडर-सीट स्टोरेज स्पेस, 90/110 फ्रंट आणि 110/90 मागील 10-इंच टायर, फॉलो-मी हेडलॅम्प फंक्शन यांसारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनी या इलेक्ट्रिक स्कुटरवर 3 वर्षे/30,000 किमीची वॉरंटी देत ​​आहे. या स्कुटर मध्ये अँटी थेफ्ट सिस्टम, इमर्जन्सी SOS यासह अनेक अपडेटेड फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.