Amazon Great Indian Festival Sale : ‘या’ Gaming Laptop वर तब्बल 41% सूट; Amazon वर बंपर ऑफर

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये आजकाल कमी वजनाचे आणि स्लिम लॅपटॉप मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरत आहे. त्याचबरोबर लॅपटॉप मध्ये देखील बरेच वर्जन उपलब्ध आहे. त्यानुसार गेमिंग लॅपटॉप आजकाल मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी उपलब्ध असून या लॅपटॉपच्या किमती देखील न परवडणाऱ्या आहेत. परंतु, अमेझॉन वर सुरू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल च्या (Amazon Great Indian Festival Sale) माध्यमातून तुम्हाला गेमिंग लॅपटॉपवर बंपर डिस्काउंट मिळू शकतो. त्यानुसार जाणून घेऊया लॅपटॉप च्या किमती आणि स्पेसिफिकेशन.

   

किंमत आणि ऑफर

अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये Lenovo कंपनीचा Lenovo ideapad gaming 3 AMD Ryzen 5 हा गेमिंग लॅपटॉप तुम्ही खरेदी करू शकतात. या सेलमध्ये तुम्हाला 41 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ऑफर करण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही 47,990 रुपयांमध्ये हा लॅपटॉप खरेदी करू शकतात. त्याचबरोबर या सेलमध्ये बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. तसेच तुम्ही एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून हा लॅपटॉप खरेदी करणार असाल तर तुम्हाला 11,350 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. आणि बँक ऑफरनुसार जर तुम्ही SBI च्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून लॅपटॉप खरेदी करणार असाल तर तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो.

स्पेसिफिकेशन

Lenovo ideapad gaming 3 AMD Ryzen 5 या लॅपटॉप मध्ये 15.6 इंच LED, FHD  डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1920 × 1080 पिक्सेल रिझोल्युशन सह येतो. त्याचबरोबर या गेमिंग लॅपटॉप मध्ये 4th जनरेशन AMD Ryzen 5 4600h प्रोसेसर देण्यात आला आहे. हा लॅपटॉप विंडोज 10 या ऑपरेटिंग सिस्टीम वर चालतो.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

Lenovo ideapad gaming 3 AMD Ryzen 5 या गेमिंग लॅपटॉप मध्ये 8 GB रॅम आणि 512 GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. हा लॅपटॉप ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध असून यामध्ये ड्युअल स्पीकर उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचबरोबर यामध्ये वेब कॅम,WIFI, ब्लूटूथ, हेडफोन जॅक, यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे.