Lenovo आणणार स्वस्तात मस्त टॅबलेट; फुल्ल चार्जवर 10 तास चालणार

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये बऱ्याच प्रकारचे, वेगवेगळ्या ब्रँडचे टॅबलेट उपलब्ध आहेत. त्यातच तुम्ही कमी किमतीमध्ये उपलब्ध असलेला एखादा टॅबलेट घेऊ इच्छित असाल तर लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये अगदी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेला टॅबलेट लॉन्च होणार आहे. हा टॅबलेट लिनोवो कंपनीचा असून त्याचे नाव Lenovo Tab M11 असे असेल. जाणून घेऊया या टॅबलेटमध्ये कोणकोणत्या खास गोष्टी देण्यात आल्या आहेत.

   

मिळालेल्या माहितीनुसार Lenovo Tab M11 या टॅबलेटमध्ये कंपनीकडून बरेच अपडेट उपलब्ध करण्यात येऊ शकतात. त्याचबरोबर या टॅबलेटच्या बॅग पॅनलवर एक LED फ्लॅश युनिटसह एक स्क्वायर कॅमेरा मॉडेल देण्यात येईल. हा टॅबलेट लेनोवो लोगो आणि एक डॉल्बी ऍटमॉस ब्रँडिंगसह एक पेन आणि फोलिओ केससह लॉन्च करण्यात येऊ शकते.

स्पेसिफिकेशन

Lenovo Tab M11 या टॅबलेटमध्ये 11 इंच LED डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले 1920×1200 पिक्सल रिझोल्युशन प्रदान करतो. मिळालेल्या माहितीनुसार हा टॅबलेट २ कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध होऊ शकतो. यामध्ये लुना ग्रे आणि सिफोम ग्रीन हे ऑप्शन्स उपलब्ध असतील. या टॅबलेट मध्ये मीडिया टेक हेलीयो G88 SOC प्रोसेसर देण्यात येऊ शकते. हा टॅबलेट अँड्रॉइड 13 वर काम करेल.

स्टोरेज किती?

Lenovo Tab M11 हा टॅबलेट कंपनी 4 GB रॅम, 8 GB रॅम आणि 12 GB रॅम स्टोरेज वेरिएंटमध्ये लॉन्च करू शकते. आणि यामध्ये 128 जीबी इनबिल्ड स्टोरेज उपलब्ध करण्यात येऊ शकते. तुम्हाला आणखीन स्टोरेज हवे असेल तर मायक्रो एसडी कार्ड च्या माध्यमातून 1TB पर्यंत स्टोरेज वाढवता येईल.