Lenovo Tab P12 भारतात लाँच, सलग 10 तास पाहू शकता व्हिडिओ; किंमत किती?

टाइम्स मराठी । मागच्या महिन्यामध्ये युरोपमध्ये लॉन्च करण्यात आलेला Lenovo Tab P12 31 ऑगस्ट ला भारतात लॉन्च करण्यात आला आहे. लेनोवो कंपनीचा हा टॅब खरेदीसाठी 5 सप्टेंबरला कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट वर उपलब्ध करण्यात येणार आहे. Lenovo Tab P12 ची किंमत 34,999 रुपये एवढी असून कंपनीने हा टॅबलेट स्टोर्म ग्रे या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे. जाणून घेऊया या टॅबलेट बद्दल खास माहिती आणि फीचर्स.

   

Lenovo Tab P12 स्पेसिफिकेशन

Lenovo Tab P12 यामध्ये 12.7 इंचाचा LTPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2944 × 1840 पिक्सल रिझोल्युशनसह 400 nits पीक ब्राईटनेस सह येतो. या डिस्प्ले ला Corning Gorilla Glass 3 प्रोटेक्शनसह कंपनीने लॉन्च केले आहे. या टॅबलेट मध्ये आता कोर मीडियाटेक डायमेंसिटी 7050 प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय हा टॅब अँड्रॉइड 13 वर काम करतो.

स्टोरेज

Lenovo Tab P12 मध्ये 8GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. त्याचबरोबर मायक्रो एसडी कार्ड च्या माध्यमातून हे स्टोरेज 1 TB पर्यंत वाढवता येऊ शकते. या टॅबलेटची जाडी 6.9 mm एवढी असून 630 ग्रॅम वजन आहे. हा टॅबलेट 2 वर्षांसाठी ओएस अपडेट आणि चार वर्षासाठी सिक्युरिटी पॅच यासाठी एलिजिबल असेल.

कॅमेरा

Lenovo Tab P12 यामध्ये 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आलेला असून फ्रंट कॅमेरा 13 मेगापिक्सल एवढा आहे. या टॅबलेट मध्ये 10200mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 10 तासांपर्यंत व्हिडिओ प्ले बॅक टाइम देते. तसेच ही बॅटरी 20 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटी आणि सेफ्टी फीचर

Lenovo Tab P12 यामध्ये देण्यात आलेल्या कनेक्टिव्हिटी फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर यात चार्जिंग साठी युएसबी टाईप सी 2.0 पोर्ट देण्यात आले आहे. यासोबतच ब्लूटूथ 5.1, ड्युअल बँड वाय-फाय, वायफाय 6,उपलब्ध आहे. याशिवाय एक्सेलेरो मीटर, ग्रॅव्हिटी सेंसर, आरजीबी सेंसर, जायरोस्कोप, ई कंपास, हॉल सेंसर उपलब्ध आहे. टॅबलेट मध्ये सेफ्टी साठी फिंगरप्रिंट सेंसर हे फिचर पावर बटन वर देण्यात आले आहे.