LG ने लाँच केली XBOOM ऑडिओ स्पीकर सिरीज; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । भारतात LG इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. आता LG ने नवीन ऑडिओ स्पीकर सिरीज लॉन्च केली आहे. या नवीन LG ऑडिओ स्पीकर सिरीजचे नाव LG XBOOM आहे. यामध्ये आऊटस्टँडिंग फीचर्स, स्ट्रॉंग साऊंड, लाईट इफेक्ट यासारखे बरेच फीचर्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर गॅदरिंग, फंक्शन, एन्जॉयमेंट साठी हा ऑडिओ स्पीकर अप्रतिम चॉईस आहे. तुम्ही देखील हा ऑडिओ स्पीकर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घेऊया या स्पीकरची किंमत.

   

कंपनीने LG XBOOM या ऑडिओ स्पीकर मध्ये दोन मॉडेल लॉन्च केले आहे. XL7S आणि XL5S असं या दोन्ही मॉडेलचं नाव आहे. या दोन्ही मॉडेलमध्ये देण्यात आलेल्या बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर XL7S मध्ये 20 तासांपर्यंत बॅटरी लाईफ उपलब्ध आहे. यासोबतच XL5S या मॉडेलमध्ये बारा तासांपर्यंत बॅटरी लाईफ आहे. या दोन्ही स्पीकर ला IPX4 वॉटर असिस्टंट रेटिंग देण्यात आली आहे.

किंमत

LG XBOOM XL7S हे मॉडेल खास करून सर्व प्रोग्राम सभेसाठी डेव्हलप करण्यात आले आहे. हे मॉडेल 250 वोट आउटपुट प्रदान करतो. आणि XL5S हे मॉडेल कोणत्याही ठिकाणी वापरता येते. यामध्ये स्ट्रॉंग बास वापरण्यात आले आहे. XL5S हा ऑडिओ स्पीकर 16.51 CM वूफर सह उपलब्ध आहे. हा स्पीकर डीप आणि बोल्ड साऊंड प्रदान करतो. या स्पीकर च्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, XL7S या मॉडेलची किंमत 54 हजार 990 आहे. आणि XL5S या मॉडेलची किंमत 44 हजार 990 रुपये ठेवण्यात आली आहे.

फीचर

LG XBOOM या लॉन्च झालेल्या स्पीकर मध्ये डायनॅमिक बास ऑपरेमायझर सुसज्ज करण्यात आले आहे. त्याचबरोबर युजर्स ओके सेशन साठी देखील या स्पीकर चा वापर करू शकतात. यामध्ये गिटार कनेक्ट करण्यासाठी देखील ऑप्शन उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचबरोबर युजर्स XBOOM च्या उपलब्ध असलेल्या ॲपवर माहित पीक सुविधेचा देखील वापर करू शकतात.