LG QNED 83 Series 4K TV : घरबसल्या घ्या थेटरचा अनुभव!! LG ने लाँच केला 65 इंचाचा स्मार्ट TV

LG QNED 83 Series 4K TV : दक्षिण कोरियाची प्रसिद्ध कंपनी LG ने भारतीय बाजारात LG QNED 83 Series लाँच केली आहे. या सिरीज अंतर्गत कंपनीने 55 इंच आणि 65 इंचाच्या २ स्मार्ट टीव्ही आणल्या आहेत. या टीव्हीमध्ये क्वांटम नॅनोसेल डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे ज्यामुळे तुम्हाला अगदी दमदार अशी क्वालिटी मिळते आणि घरबसल्या सिनेमागृहात असल्याचा फील तुम्हाला येईल. आज आपण या स्मार्ट टीव्हीचे खास फीचर्स आणि किमतीबाबत जाणून घेणार आहोत.

   

काय आहेत फीचर्स- LG QNED 83 Series 4K TV

LG ची ही स्मार्ट टीव्ही सिरीज 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्लेसह येते. यामध्ये क्वांटम डॉट आणि नॅनोसेल तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या टीव्ही मध्ये डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे त्यामुळे तुमचा आवाज चांगल्या प्रकारे ऐकता येईल. LG QNED 83 Series 4K TV मध्ये α7 Gen6 AI 4K प्रोसेसर दिला असून तुम्हाला टीव्ही वरील चित्रे अतिशय आकर्षक आणि फुटणार नाहीत अशा प्रकारे डिझाईन करण्यात आले आहे. याशिवाय, हा टीव्ही डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी अॅटमॉस, AI सुपर अपस्केलिंग, लोकल डिमिंग आणि अॅडव्हान्स्ड गेमिंग क्षमता यांनाही सपोर्ट करतो. या स्मार्ट टीव्ही WebOS ऑपरेटिंग सिस्टमसह येत असून खास गोष्ट म्हणजे Netflix, Apple TV+, Disney+ Hotstar आणि Amazon Prime Video यांसारखे OTT प्लॅटफॉर्म या टीव्ही मध्ये आधीपासूनच इन्स्टॉल केलेले आहेत.

टीव्हीच्या लॉन्च वेळी , LG इंडियाचे होम एंटरटेनमेंट डायरेक्टर यंग ह्वान जंग यांनी म्हंटल कि, “आम्हाला QNED 83 टीव्ही लाँच करताना खूप आनंद होत आहे. हा स्मार्ट टीव्ही अपडेटेड तंत्रज्ञान आणि पाहण्याचा वेगळा अनुभव देईल अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. टीव्हीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, LG QNED 83 Series 4K TV च्या 55 इंच मॉडेलची किंमत 1,59,990 रुपये आहे. तर 65 इंच मॉडेलची किंमत 2,19,990 रुपये आहे. तुम्ही हा टीव्ही LG च्या अधिकृत वेबसाइट, LG शोरूम, क्रोमा, रिलायन्स डिजिटल वरून खरेदी करू शकता.