टाइम्स मराठी । CES 2024 मध्ये म्हणजेच Consumer Electronics Show मध्ये नवनवीन आणि आकर्षक गॅजेट्स सादर केले जात आहेत. आत्तापर्यंत तुम्ही अनेक प्रकारच्या TV बघितल्या असतील. पूर्वीच्या काळी TV चा आकार मोठा असायचा, पण नंतर जस जशी टेक्नॉलॉजी पुढे गेली तस तस वजनाने हलक्या आणि स्लिम अशा LED TV बाजारात येऊ लागल्या. पण आता हे तंत्रज्ञान आणखी पुढे गेलं असून प्रसिद्ध कंपनी LG ने वायरलेस पारदर्शक TV सादर केला आहे. म्हणजेच या TV मधून तुम्ही आरपार बघू शकता. हा टीव्ही 4K रिझोल्यूशन आणि LG च्या वायरलेस ऑडिओ-व्हिडिओ तंत्रज्ञानासह येतो. आज आपण या TV चे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.
LG कंपनीचा हा पारदर्शक TV अल्फा 11 एआय प्रोसेसरसह येत असून यामध्ये खालच्या बाजूला स्पीकर देण्यात आले आहे. या TV चा लूक बघितला तर एखाद्या फिश टॅंक प्रमाणेच हा टीव्ही तुम्हाला दिसेल. या टीव्हीमध्ये कॉन्ट्रास्ट स्क्रीन देण्यात आली आहे, जी एका बॉक्समध्ये फिरते. तुम्ही फक्त एका बटणाने ते आत किंवा बाहेर घेऊ शकता. या टीव्हीची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात एक टी-बार आहे, जो हवामान, वेळ यासारखी माहिती देतो. याशिवाय हा टी-बार शोकेस शो म्हणूनही वापरता येईल.
अल्फा 11 AI प्रोसेसर असल्याने हा टीव्ही पूर्वी पेक्षा ४ पट चांगला परफ़ॉर्मन्स देतो. कंपनीच्या मते, ही जी एक्सट्रा पॉवर आहे ती जवळपास 70 टक्के चांगले ग्राफिक्स परफॉर्मन्स देते. हा बॉक्स वायरलेस पद्धतीने टीव्हीवर व्हिडिओ आणि ऑडिओ पाठविण्यास सक्षम आहे. या टीव्हीमध्ये AI-संचालित आर्ट शोकेस मोड आहे, जो विविध प्रकारच्या कलाकृती प्रदर्शित करू शकतो. LG ने अजून तरी या पारदर्शक टीव्हीच्या किंमतीबद्दल नेमका आकडा जाहीर केलेला नाही. परंतु याच वर्षी म्हणजे 2024 मध्ये हा टीव्ही विकण्याची LG ची योजना आहे.