LG ने लॉन्च केले हाय Washtower वॉशिंग मशीन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स 

टाइम्स मराठी । LG कंपनीचे भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. आता कंपनीने हाय वॉशटॉवर वॉशिंग मशीन लॉन्च केले आहे. लॉन्च करण्यात आलेला या मशीनमध्ये स्ट्रीम ड्रायर सोबतच स्टॅक्ड व्हर्टिकल डिझाईन देण्यात आली आहे. या LG WASH TOWER ची किंमत भारतामध्ये दोन लाख 75,000 रुपये एवढी आहे. तुम्ही हे वॉशिंग मशीन LG च्या ऑनलाईन स्टोर वरून खरेदी करू शकतात. याशिवाय LG एक्सक्लूझिव स्टोअर्स, रिलायन्स डिजिटल, क्रोमा यासारख्या ऑफलाइन मार्केटमध्ये देखील हे वॉशिंग मशीन उपलब्ध करण्यात आले आहे.

   

डिझाईन

LG Washtower या वॉशिंग मशीन मध्ये कंपनीने फ्रंट लोड डिझाईन  दिली आहे. हे वॉशिंग मशीन मेटल फिनिशिंग सह युनीबॉडी फॉर्म फॅक्टर सह उपलब्ध करण्यात आले आहे. या वॉशिंग मशीनच्या साईज बद्दल बोलायचं झालं तर  600mm × 1655mm  × 660mm साईज मध्ये उपलब्ध आहे. कंपनीने हे वॉशिंग मशीन कॉम्पॅक्ट प्लेस वर फिट करण्यासाठी डिझाईन केले असून स्पेशली भारतीय घरांसाठी डेव्हलप करण्यात आले आहे.

मोड आणि फीचर्स

LG Washtower या वॉशटॉवर वॉशिंग मशीन मध्ये वॉश मोड आणि बरेच ऑप्शन उपलब्ध आहेत. यासोबतच मशीनच्या सेंटरला एक कंट्रोल ऑप्शन देखील दिले आहे. जेणेकरून सहजरीत्या वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुण्यास मदत होईल. यासोबतच  जर तुम्हाला स्पीड मध्ये कपडे धुवायचे असेल तर  या वॉशटॉवर मध्ये टर्बो वॉश 360 हा मोड देण्यात आला आहे. या मोडच्या माध्यमातून 13 किलोग्राम क्षमतेने कपडे वॉश करता येतील. आणि 10 किलोग्रॅम एवढ्या क्षमतेने ड्राय करता येईल. यामध्ये कंपनीने 6 वेगवेगळे मोड उपलब्ध केले आहे.

AI फीचर्स चा वापर

LG Washtower या वॉशिंग मशीनच्या माध्यमातून वॉश केलेले कपडे  धुळीच्या कणांपासून  फ्री राहतील. LG WASH TOWER मध्ये AI बेस्ट फीचर वापरण्यात आले आहे. या फीचरच्या माध्यमातून कपड्यांसाठी बेस्ड वॉश मोड ऑटोमॅटिक पद्धतीने निर्धारित करण्यासाठी मदत करते. कंपनीने या वॉशिंग मशीनच्या मोटर वर 10 वर्षांची वॉरंटी दिली आहे. याशिवाय मशीनच्या बऱ्याच पार्टस वर 1 वर्षांची देखील वॉरंटी आहे.