OLA ला टक्कर देणार Liger X इलेक्ट्रिक स्कूटर, 125 KM रेंज, किंमत किती?

टाइम्स मराठी । आजकाल पेट्रोल डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल वाहन चालवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पेट्रोल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे जास्त कल दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांची चलती दिसत असून  बऱ्याच ऑटोमोबाईल निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये वेगवेगळ्या फीचर्स सह वाहन लॉन्च करत आहे. लवकरच आता इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये Liger MOBILITY कंपनी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. यामध्ये कंपनीकडून दोन व्हेरिएंट लॉन्च करण्यात येणार असून Liger X आणि Liger X+ असं या दोन्ही व्हेरिएंटचे नाव असेल. जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कूटरचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.

   

फिचर्स

Liger X+ या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये कॉलिंग, मेसेज अलर्ट नोटिफिकेशन, यासोबतच टर्न बाय टर्न नेवीगेशन यासारखे फीचर्स देण्यात येऊ शकतात. एवढेच नाही तर प्रीमियम पीएफटी कन्सोल देखील मिळेल. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये LCD डिस्प्ले रिवर्स मोड, लिक्विड कुल्ड बॅटरी देण्यात येऊ शकते. ज्यामुळे ही स्कूटर लॉंग रूट वर हाय परफॉर्मन्स देईल. यासोबतच लाईव्ह लोकेशन राईड हिस्टरी आणि बॅटरी पॅक SOC यासारखे फीचर्स देखील यामध्ये उपलब्ध करण्यात येतील.

स्पेसिफिकेशन

Liger X+ या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये १५० किलोग्रॅम एवढी लोड क्षमता असू शकते. यासोबतच 4G कनेक्टिव्हिटी GPS देखील या सोबत उपलब्ध करण्यात येऊ शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वेगळ्या डिझाईन मध्ये लाईट्स उपलब्ध करण्यात येऊ शकतात. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मोठ्या साईज मध्ये अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये देण्यात आलेली बॅटरी एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यावर 125 किलोमीटर पर्यंत रेंज देते. आणि LIGER X ही इलेक्ट्रिक स्कूटर जास्तीत जास्त 80 किलोमीटर अंतर पार करेल .

किंमत

मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही स्कूटर न्यू जनरेशन स्टाईल मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. ही स्कूटर 90 हजार रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात येऊ शकते. परंतु किंमत आणि डिलिव्हरी डेट याबाबत आणखीन कोणतीच माहिती मिळाली नाही. ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत  उपलब्ध असलेल्या Ola S1 Pro या इलेक्ट्रिक स्कूटरला तगडी फाईट देईल.