Light Bill : लाईटबील जास्त येतंय का? ‘या’ 3 गोष्टी बदला, 50% पैसे वाचतील

Light Bill । सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोजच्या वापरातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींत वाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेला जगणं मुश्किल होऊन बसले आहे. अशात जास्त येणारे लाईट बिल हि तर आज प्रत्येकाची समस्या बनली आहे. तुमचंही वीजबिल जात येत असेल तर हि बातमी तुमच्याकरताच आहे. आज आम्ही तुम्हाला अशा तीन गोष्टींबाबत सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं लाईटबील कमी येण्यास मदत होईल. यातून तुमच्या 50 टक्के पैशांची बचत होऊ शकते.

   

AC पाहिजे तेवढा वापर पण…

सध्या जून महिना सुरु असला तरी अद्याप वातावरणात उकाडा कायम आहे. त्यामुळे ऑफिस असो किंवा घर अनेकजण AC लावने पसंद करतात. परंतु एसी च्या अतिवापराने लाईटबील वाढून येणार अशी भीती वाटणे साहजिक आहे. परंतु तुम्ही विंडो AC न घेता नवीन आलेला Inverter AC घेतला तर तुमच्या वीजबिलात फरक पडू शकतो. तेव्हा AC घेताना 5 स्टार AC विकत घ्या जेणेकरून Light Bill बचत होईल.

गिझर वापरणे थांबवा

तुम्ही अजूनसुद्धा घरामध्ये पाणी गरम करण्यासाठी इलेक्ट्रिक गिझर वापरत असाल तर ते थांबवा. आता बाजारात गिझरला पर्ययायी अनेक उपकरणे आली आहेत. यामध्ये वॉटर हिटिंग रॉड हा एक उत्तम पर्याय आहे. तो इलेक्ट्रिक गिझरपेक्षा कमी वीज वापरतो आणि पाणी लवकर तापते.

किचन मध्ये करा हा बदल

अनेकजण स्वयंपाक घरात (Kitchen) चिमणीचा वापर करतात. स्वयंपाक घरातील गरम हवा बाहेर फेकण्यासाठी चिमणी अधिक विजेचा वापर करते. तसेच बऱ्याचदा आपण ती बंद करणे विसरतो. परिणामी त्यामुळे अधिक विजबिलाला सामोरे जावे लागते. तेव्हा चिमणी काढून स्वयंपाक घरात एक्सोस फॅन लावणे फायद्याचे ठरू शकते. यामुळे वीजेची बचत होऊ शकते.