LM 350h : ही कार म्हणजे चालतं-फिरतं हॉटेलच; TV, फ्रिजसह मिळतात या खास सुविधा

टाइम्स मराठी । सध्याचे जग हे टेक्नॉलॉजीचे जग असून दररोज आपल्याला प्रत्येक क्षेत्रात नवं काहीतरी पाहायला मिळतेय. ऑटोमोबाईल सेक्टर मध्येही काही वर्षांपासून मोठा बदल झाला असून अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि अपडेटेड फीचर्ससह नवनवीन गाड्या बाजारात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Lexus India ने भारतात आपली LM 350h लक्झरी MPV 2 कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली आहे. हि कार म्हणजे चालतं-फिरतं हॉटेलच म्हणावं लागेल, कारण यामध्ये आरामदायी सीट, TV, फ्रिजसह अनेक खास अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. ही कार देशातील सर्वात महागडी आणि आलिशान MPV आहे.

   

Lexus LM च्या लुक आणि डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही बघू शकता की कारच्या समोर एक मोठी ओव्हरसाइज ग्रिल आहे, जी स्लीक एलईडी हेडलॅम्प आणि स्टायलिश व्हर्टिकल फॉग लॅम्प हाउसिंगशी जोडलेली आहे. गाडीमध्ये स्लोपिंग बोनेट, मोठे लोखंडी जाळी आणि समोरील विंडशील्डमुळे कारचा लूक अधिक आकर्षक दिसत आहे. समोरील बाजूला असलेल्या लोखंडी जाळीची डिझाईन षटकोनी आकाराची आहे.

आतमध्ये मिळतात खास सुविधा – LM 350h

परंतु आतून बघितल्यानंतर या कारचे खरं रूप तुम्हाला दिसेल. अतिशय प्रशस्त अशी जागा, 480mm स्लाइड रेंजसह सीट्स, 48-इंचाचा टीव्ही, 23-स्पीकर वाला ऑडिओ सिस्टम, फोल्डेबल टेबल, व्हॅनिटी मिरर, रीडिंग लाइट्स आणि छोटा फ्रीज देण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे या रॉयल कर मध्ये प्री-कॉलिजन सिस्टम देण्यात आली आहे. ज्यामुळे गाडीची टक्कर होण्यापूर्वीच ती अलर्ट करेल. कारमध्ये सुरक्षित एक्झिट असिस्ट सिस्टम देखील उपलब्ध आहे. अधिक सामान ठेवण्यासाठी मागील सीट तुम्ही फोल्ड करू शकता. या नवीन लक्झरी एमपीव्हीमध्ये आर्मरेस्ट आणि ऑटोमन हीटरचाही समावेश आहे. अजून तरी हि सुविधा इतर कोणत्याही लेक्सस मॉडेलमध्ये दिलेलं नाही. त्यामुळे प्रचंड थंडीत सुद्धा गाडीत आरामात बसता येते.

Lexus LM 350h मध्ये 2.5 लिटर, 4-सिलेंडर पेट्रोल हायब्रिड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन CVT गिअरबॉक्सला जोडण्यात आलं असून ते 92hp पॉवर आणि 240Nm टॉर्क जनरेट करते. हि कार २ व्हेरियेण्ट मध्ये लाँच करण्यात आली आहे. एक म्हणजे 4-सीटर आणि दुसरी म्हणजे 7-सीटर .. यातील 4-सीटर ची किंमत 2.5 कोटी रुपये आहे, तर 7-सीटर ची किंमत 2 कोटी रुपये आहे.