Earbuds ची एक जोडी हरवली? घाबरू नका, अशा पद्धतीने शोधा

टाइम्स मराठी । आजकाल वायर्ड इयरबड्स पेक्षा वायरलेस इयरबड्स चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ऑडिओ ऐकण्यासाठी आणि कॉलिंग साठी इयर बड्स हे लोकप्रिय प्रॉडक्ट आहे. इयर बड्स च्या माध्यमातून अप्रतिम कॉलिटी मध्ये ऑडिओ ऐकण्यास मदत होते. परंतु वायरलेस असल्यामुळे  बऱ्याचदा इयर बड्स हरवले जातात. किंवा कुठेतरी पडतात. अशावेळी इयर बड्स शोधण्यास प्रचंड मेहनत घ्यावी लागते. कारण इयर बड्स आकारामध्ये एवढे छोटे असतात की, लवकर दिसत नाही. त्यामुळे इयर बड्स हरवल्यानंतर मोठी समस्या उद्भवते. याशिवाय इयर बड्सचे एक पेयर हरवल्यानंतर दुसरे पेयर्ड कामात येत नाही. अशावेळी आपण सोप्या पद्धतीने आणि मोबाईलच्या मदतीने इयर बड्स शोधू शकतो. जाणून घेऊया ते कसं.

   

बऱ्याच प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड इयर बड्स सोबतच ॲप्स ला समर्थन देतात. या एप्लीकेशनच्या माध्यमातून तुम्ही इयर बड्स कस्टमाईज करू शकतात. याशिवाय तुमच्या इयर बड्स सोबत ट्रॅकिंग सपोर्ट उपलब्ध असेल तर तुम्हाला इयर बड्स पेयर्ड शोधण्यास मदत होऊ शकते. गुगलचे फाइंड माय डिवाइस एप्लीकेशन तुम्हाला माहित असेल. या फाइंड माय डिवाइस च्या माध्यमातून तुम्ही मोबाईलच नाही तर इयर बड्स देखील ट्रॅक करू शकतात. या ॲपमुळे तुम्हाला इयर बड्स शोधण्यास मदत होईल.

 अशा पद्धतीने शोधा हरवलेले इयर बड्स 

1)  Find My Device च्या माध्यमातून इयर बड्स शोधण्यासाठी सर्वात पहिले ॲप ओपन करा.

2) ॲप ओपन केल्यानंतर डिवाइस लिस्ट वर जा.

3) लिस्ट ओपन झाल्यानंतर  तुम्ही तुमच्या इयर बड्स चे नाव शोधू शकतात.

4) नाव शोधल्यानंतर तुम्हाला सर्च हे ऑप्शन दिसेल.

5) सर्च केल्यानंतर तुम्ही तुमचे इयर बड्स सोप्या पद्धतीने शोधू शकता.

.