Lotus Emira 2024 मध्ये भारतात लाँच होणार; लूक पाहूनच पडाल प्रेमात

टाइम्स मराठी । ब्रिटिश ऑटोमोबाईल निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाणारी Lotus Cars कंपनीने इलेक्ट्रा SUV सोबतच भारतीय बाजारपेठेमध्ये एन्ट्री केली आहे. लोटस कार्स कंपनीची Lotus Emira ही कार अत्यंत फेमस आहे. ही कार आता कंपनीकडून भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात येणार आहे.  या स्पोर्ट्स कारच्या लॉन्चिंग बद्दल कंपनीने घोषणा करत भारतीय बाजारात ती कधी येणार यांची माहिती दिली. त्यानुसार 2024 एप्रिलमध्ये नवीन दिल्ली येथील लोटस एक्सक्लुझिव्ह मोटर शोरूमच्या माध्यमातून ही कार विक्री करण्यात येणार आहे. जाणून घेऊया या Lotus Emira स्पोर्ट कारचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

किंमत

Lotus Emira या 2024 मध्ये लॉन्च होणाऱ्या स्पोर्टकारच्या किमतींचा खुलासा करण्यात आला आहे. त्यानुसार या कारची एक्स शोरूम किंमत 3 करोड रुपयांपेक्षा कमी असेल. ही कार पोर्शे 718 कॅमेन आणि जगुआर एफ टाइप कुप या कार सोबत प्रतिस्पर्धा करेल. ही अपकमिंग कार कॉन्फिगरेशन मध्ये रियर व्हिल ड्राईव्ह सिस्टीम सह येईल. या कारचे वजन 1405 kg एवढे आहे. ही स्पोर्टकार 4.5 सेकंदापेक्षाही कमी वेळेत प्रतितास 0 ते 100 किलोमीटर स्पीड वाढवण्यास पकडते. या कारचे टॉप स्पीड प्रति तास 290 किलोमीटर इतकं आहे.

पावरट्रेन

Lotus Emira या अपकमिंग स्पोर्टकार मध्ये तीन पावरट्रेन ऑप्शन उपलब्ध करण्यात येणार आहे. यामध्ये एक AMG सोर्स्ड 360 hp, 2 लिटर चार सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन, टोयोटा सोर्स्ड 400 hp, 3.5 लिटर सुपर चार्ज्ड V6 इंजिन या तीन पॉवरट्रेन उपलब्ध असतील.   त्यानुसार पहिली पावरट्रेन 8 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध करण्यात येईल. टोयोटा सोर्स्ड 400 hp, पावरट्रेन ही 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन्स ने सुसज्ज असेल.

फीचर्स

LOTUS EMIRA या अपकमिंग स्पोर्ट कार मध्ये देण्यात येणाऱ्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर, ही डिझाईन हाइपरकारने प्रेरित असेल. या कारमध्ये देण्यात येणार असलेले व्हर्टिकल LED हेडलाईट आणि हूड स्कूप हे हाइपरकार प्रमाणे असतील. यामध्ये एयर इंटेक, स्मॉल ओव्हरहँग, HUMP, गुडइयर ईगल F1 सुपरस्पोर्ट रबर टायर सह 20 इंच अलॉय व्हील, LED ब्रेक लाईट, फ्लॅट सी आकारात LED लाईट क्लस्टर यासारखे फीचर्स मिळणार आहे.

इंटेरियर

LOTUS EMIRA या कारमध्ये जुन्या मॉडलच्या तुलनेत  फिट अँड फिनिशिंग मध्ये बरेच बदल दिसून येतील. यासोबतच इंटेरियर कॉलिटी मध्ये देखील  बदल करण्यात आले आहे. त्यानुसार कारच्या केबिनमध्ये 12.3 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25 इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन मिळेल. या इन्फोटेनमेंट टचस्क्रीन मध्ये ऍप्पल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो कारप्ले देण्यात येईल. यासोबतच फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हील्स, सेंटर कन्सोल, साईड एसी वेंट यामुळे कारला स्पोर्टी मेटालिक डिटेलिंग मिळेल.

ADAS फीचर्स

LOTUS EMIRA या कारमध्ये 151 लिटर छोटा बूट स्पेस मिळेल. त्याचबरोबर सेफ्टीसाठी या स्पोर्ट कार मध्ये  एयरबॅग्स मिळतील. या सोबतच ऍडॉप्टीव्ह क्रूज कंट्रोल, अँटी कॉलिजन सिस्टीम, टायर्ड अलर्ट, रोड साईन अलर्ट, रियर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट यासारखे ADAS फीचर्स देखील देण्यात येणार आहे.