रशियाचे Luna 25 नेमकं कुठे कोसळलं? चंद्रावरील ‘ती’ जागा सापडली

टाइम्स मराठी । 23 ऑगस्टला भारताच्या चांद्रयान तीन मिशनच्या विक्रम लॅन्डरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं . यामुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश ठरला आहे. हे चंद्रयान तीन मिशन 14 जुलैला लॉन्च करण्यात आले होते. भारताबरोबर रशियाने देखील चांद्रयान मिशन लूना 25 हे लॉन्च केले होते. एवढच नव्हे तर भारतीय याना पेक्षा रशियन यान हे चंद्रावर सर्वात पहिले लँडिंग करेल असं सांगण्यात आलं होतं. परंतु रशियन यान चंद्राभोवती भ्रमण करत असताना प्री लँडिंग ऑर्बिट एन्ट्री करण्यावेळीच या लॅन्डरचा ग्राउंड स्टेशन सोबत संपर्क तुटला. आणि रशियन यान हे चंद्रावर लँड होऊ शकले नाही. रशियाचे लूना 25 हे चंद्राच्या पृष्ठभागावर हे यान कोसळलं, ;परंतु नेमकं कोणत्या ठिकाणी हे यान कोसळलं ती जागा आता समोर आली आहे.

   

नासा ने चंद्रावर ज्या ठिकाणी रशियन लुना क्रॅश झाले होते ती जागा शोधून काढली आहे. रशियन यान क्रॅश झाल्यानंतर नासाने लूनार रिकॉनीसेन्स ऑर्बिटर स्पेस क्राफ्टने चंद्रावर एक नवीन क्रेटर शोधला आहे. नासाच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी स्पेस क्राफ्ट क्रॅश झाले होते , त्या ठिकाणी सर्वात मोठा खड्डा बनला आहे. 19 ऑगस्टला हे रशियन लुना२५ क्रॅश झाले होते. त्यानंतर रशियन स्पेस एजन्सी रोस्कोस्मोसने 21 ऑगस्टला इम्पॅक्ट पॉईंट च्या निष्कर्षानुसार रशियन यान क्रॅश झाल्याची जागा दाखवली. LROC टीम आणि मिशन ऑपरेशन टीम 22 ऑगस्टला LROC स्पेस क्राफ्ट कॅप्चर करण्यासाठी डिझाईन आणि कमांड पाठवण्यासाठी सक्षम होते. त्याचबरोबर हे फोटो घेण्याची प्रक्रिया 24 ऑगस्टला दुपारी 2.15 मिनिटांनी सुरू झाली होती. आणि 4 तासानंतर पूर्ण झाली होती.

LROC टीमने क्रॅश होण्यापूर्वी फोटो कॅप्चर केले होते त्यांची तुलना केल्यास आणखीन एक लहान खड्डा सापडला. जून 2022 मध्ये पहिल्यांदाच या खड्ड्याचा फोटो काढण्यात आला होता. आणि हा खड्डा लुना 25 च्या अंदाजे इम्पॅक्ट बिंदूच्या जवळ होता. यानुसार LRO ने यातून असा निष्कर्ष काढला की, हा खड्डा नैसर्गिक प्रभावाने नाही तर लुना 25 च्या मोहिमेच्या माध्यमातून तयार झाला आहे. हा खड्डा दहा मीटर व्यास एवढा आहे. त्याचबरोबर लुना 25 च्या लँडिंग साईट पासून हा सुमारे चारशे किलोमीटर अंतरावर आहे.

रशियन यान हे आकाराने सर्वात मोठे यान होते. मोठे यान हे जास्त खर्चीक असते. आणि त्याचा वेग देखील जास्त होता. त्यामुळे रशियन यान भारताच्या चांद्रयानापेक्षा लवकर चंद्रावर लँड करेल असं सांगण्यात आलं होतं. रशियाचे हे 1976 नंतरचे म्हणजे 47 वर्षानंतर रशियाचे पहिले चंद्रयान मिशन होते. मात्र हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळल्याने रशियाचा भ्रमनिरास झाला.