Luxury Car : ‘या’ क्रिकेटपटू ने घेतली सर्वात महागडी कार! मुकेश अंबानीलाही टाकले मागे…

टाइम्स मराठी टीम । महागडी कार खरेदी करणे, ती चालवणे हा अनेक जणांचा आवडता विषय असतो. अशीच आवड असलेल्या एका सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ने आता नवीन कार घेतली आहे. वेगवान विदेशी कारची आवडत असणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आहे. ती भारतात विकली जाणारी सर्वात महागडी आणि वेगवान गाडी आहे. Luxury Car

   

प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आता Lamborghini Urus S ही भारतात विकली जाणारी महागडी आणि वेगवान चालणारी SUV गाडी घेतली आहे. सचिन तेंडुलकरने घेतलेली ही नवीन कार टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सच्या निळ्या जर्सीशी जुळती म्हणजे निळ्या कलरची आहे. याचबरोबर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांच्याकडे देखील ती कार अजूनही नाही.

भारतातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या लॅम्बोर्गिनी Urus S SUV या कार ची किंमत 4.18 कोटी रुपये आहे. ही नवीन Lamborghini Urus S कार जुन्या Urus सुपर SUV चे प्रगत आणि नवीनतम प्रकार आहे. ही लक्झरी सुपरकार 3.5 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेगाने चालते. आणि 12.5 सेकंदात ती 0-200 किमी प्रतितास वेग घेण्यास सक्षम आहे. त्याच्या टॉप-स्पीडबद्दल बोलायचे झाले तर, ही कार 305 किमी प्रतितासचा वेग गाठण्यास सक्षम आहे.

सचिन तेंडुलकर कडे बऱ्याच कार आहेत. त्यामध्येपॉर्श 911 टर्बो एस, पोर्श केयेन टर्बो, बीएमडब्ल्यू i8 आणि इतर अनेक लक्झरी स्पोर्ट्स यांचा समावेश होतो. बऱ्याचदा तो या गाड्यांमध्ये फिरताना दिसतो. एवढ्या एका पेक्षा एक जास्त आलिशान कार असताना देखील त्याची ही पहिली लॅम्बोर्गिनी कार आहे.