विद्यार्थ्यांसाठी छप्परफाड ऑफर!! MacBooks आणि iPads वर बंपर Discount

टाइम्स मराठी । अँपल (Apple) कंपनीचा आयफोन (iPhone घेण्याकडे तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. अँपल हा भारतातील तरुणांचा आवडता मोबाईल ब्रँड असून आता एप्पल कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर बॅक टू स्कूल डील्स सुरू आहे. या डीलच्या माध्यमातून Apple ने काही प्रॉडक्टवर विद्यार्थ्यांसाठी सूट दिली आहे. यामध्ये ॲपल कंपनीचा ipad, Macbooks यावर देखील सूट देण्यात आलेली आहे. ॲपल ने आणलेली हिल डील ची मुदत 2 ऑक्टोंबरपर्यंत वैध असणार आहे. महत्वाचे म्हणजे या ऑफरचा लाभ फक्त विद्यार्थी आणि रेगुलर कंजूमर घेऊ शकतात.

   

अँपल इंडियाच्या आधारित वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, Apple कंपनीने नुकताच M2 चा Macbook Air 15 लॉन्च केला आहे. त्याचबरोबर याच मॅकबुकवर कंपनी बंपर डिस्काउंट देणार आहे. Macbook Air 15 ची किंमत 1,34,900 एवढी आहे. डिस्काउंट च्या माध्यमातून तुम्ही 1,24,900 रुपयांमध्ये तुम्ही हा मॅकबुक खरेदी करू शकता. Apple च्या Macbook Air13 M1 ची किंमत 99,900 रुपये एवढी असून तुम्हाला 10,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. म्हणजेच तुम्ही 89,900 रुपयामध्ये हा मॅकबुक खरेदी करू शकतात. त्याचबरोबर macbook Air 13 मध्ये तुम्हाला M2 चिपसेट मध्ये हवे असेल तर तुम्ही 10,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 1,04,900 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. हा मॅकबुक 1,14,900 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आली होती.

जर तुम्ही Macbook pro खरेदी करू इच्छित असाल तर त्यावर देखील तुम्हाला डिस्काउंट देण्यात येणार आहे. Macbook pro 13 इंच मॉडेलची किंमत 1,29,900 एवढी असून तुम्ही 1,19,900 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. यासोबतच Macbook pro 14 इंच मॉडेलची किंमत 1,99,900 एवढी आहे. पण डिस्काउंट च्या माध्यमातून तुम्हाला 1,84,900 रुपयांमध्ये मिळू शकतो. Macbook pro 16 इंच मॉडेल ची किंमत 2,49,900 एवढी असून तुम्ही 2,29,900 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. जर तुम्ही एप्पल चा imac खरेदी करू इच्छित असाल तर यावर देखील तुम्हाला डिस्काउंट देण्यात येणार आहे. डिस्काउंट सह तुम्ही imac 1,24,900 रुपयात खरेदी करू शकता.

ॲपल कंपनीकडून देण्यात येणाऱ्या स्कूल ऑफर च्या माध्यमातून mac mini वर देखील डिस्काउंट देण्यात येत आहे. याशिवाय mac studio च्या नुकताच लॉन्च झालेल्या mac pro मॉडेल वर कोणत्याही प्रकारचा डिस्काउंट देण्यात येत नसून ipad Air, ipad pro 11, ipad pro 12.9 या मॉडेल्सवर डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही mac mini खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला डिस्काउंट ऑफर सह 49,900 रुपयात मिळू शकते. यासोबतच ipad Air तुम्हाला 54,900 रुपयात मिळू शकतो. जर तुम्ही ipad pro 11 खरेदी करू इच्छित असाल तर 76,900 कृपया तुम्ही खरेदी करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही ipad pro 12.9 हे मॉडेल 1,02,900 रुपयात खरेदी करू शकतात.