टाइम्स मराठी। मोबाईल इंटरनेटच्या क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचा बदल झाला आहे. मेड इन इंडिया इंटरनेट ब्राउझर वीरा (Veera) लॉन्च करण्यात आले आहे. हे ब्राउझर सध्या अँड्रॉइड युजरसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. काही दिवसानंतर हे ब्राउझर ios आणि Windows व्हर्जन मध्ये देखील लॉन्च करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. वीरा ब्राउझरच्या मदतीने तुम्हाला थर्ड पार्टी ट्रॅकर्स, जाहिराती, ऑटो प्ले व्हिडिओ, आणि डिफॉल्टनुसार ब्लॉक हे ऑप्शन मिळणार आहे.
Veera ब्राउझर युजर्सला जास्त चांगला डिजिटल अनुभव प्रदान करेल. यामुळे स्पीडमध्ये इंटरनेट सर्चिंग करता येईल. तसेच वीरा ब्राउझर हे अत्यंत सुरक्षित असून हे ब्राउझर क्रॅश होणार नाही. भारतीय इंटरनेट वापर करताना एक जलद, सुरक्षित खाजगी ब्राउझिंग प्लॅटफॉर्मची सुविधा देणे हे आमचे ध्येय आहे. त्याचबरोबर इंटरनेटचा अनुभव बळकट करण्यासाठी आम्ही या प्रवासाला सुरुवात केली असं वीराचे संस्थापक अर्जुन घोष यांनी सांगितलं.
आजकाल मोबाईल फोनचा (Mobile Phone) वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून मोबाईल यूजर दररोज 24 तास ऑनलाइन असतात. त्याचबरोबर एक अब्ज भारतीय इंटरनेट सेवेचा वापर करतात. अशा परिस्तिथित वीरा हे ब्राउझर युजरला चांगला अनुभव देऊ शकते. ही फक्त आमची सुरुवात असून आणखीन बरेच फीचर्स आम्ही युजर्सला उपलब्ध करून देणार आहोत असं वीराचे संस्थापक अर्जुन घोष यांनी सांगितलं.
वीरा या ब्राउझरने स्पीडच्या बाबतीत एक नवीन बेंच मार्क सेट केला आहे. त्यानुसार विराने स्पीडोमीटर वर 40.8 प्रति मिनिट वेग मिळवला आहे. यावरून समजते की इतर ब्राउझरच्या तुलनेत वीरा आघाडीवर आहे. वीरा ब्राउझर मध्ये लाईव्ह ट्रॅकरची देखील सुविधा कंपनीने दिली आहे. यासोबतच युजर्स ला रियल टाईम मध्ये ब्लॉक केलेल्या जाहिराती मोजण्याची देखील परवानगी वीराकडून देण्यात येते. तसेच युजर्स चा डेटा देखील सेव्ह केला जाईल. एवढेच नाही तर विरा ब्राउझरच्या मदतीने ट्रॅकर्सला ब्लॉक देखील करता येणार आहे.