Mahindra Armada येणार नव्या अवतारात; 2025 पर्यंत होणार लाँच

Mahindra Armada । महिंद्रा कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये ARMADA ही कार नवीन अवतारामध्ये लॉन्च करणार आहे. सध्या कंपनी ही कार नवीन प्लॅटफॉर्मवर डेव्हलप करत आहे. या कार मध्ये नवीन फीचर्स उपलब्ध करण्यात येणार असून याबाबत कंपनीने अजूनही अधिकारीक घोषणा केलेली नाही. महिंद्रा कंपनीच्या या नवीन मॉडेल बद्दल मिळालेल्या माहितीनुसार, ही कार 2025 मध्ये लॉन्च होऊ शकते.

   

लुक आणि फीचर – Mahindra Armada

Mahindra Armada या एसयूव्हीमध्ये  बरेच नवीन फीचर्स देण्यात येणार आहेत. हे फीचर्स पूर्णपणे व्हॅल्यू फॉर मनी असतील. यामुळेच ही एसयूव्ही घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढेल. महिंद्रा कंपनीची ही नवीन SUV टोयोटा फॉर्च्युनर्सच्या सेगमेंट मध्ये लॉन्च करण्यात येऊ शकते. कारण ही प्रीमियम एसयूव्ही असणार आहे. यापूर्वी देखील महिंद्रा कंपनीने या सेगमेंट मध्ये एक SUV लॉन्च केली होती.  परंतु या एसयूव्हीची विक्री मोठ्या प्रमाणात झाली नाही. त्यामुळे महिंद्रा ने ती SUV बंद केली. आता महिंद्रा कंपनी ही नवीन एसयूव्ही या नव्या सेगमेंट मध्ये लॉन्च करण्याची तयारी करत आहे. त्यानुसार ही SUV टोयोटा फॉर्च्यूनर आणि एमजी ग्लोस्टर यासारखा लुक देऊ शकते.

किंमत किती असेल

Mahindra Armada ही SUV कार किती रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल याबाबत कंपनीने अजून तरी अधिकृतरीत्या कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु या कारची अंदाजे किंमत 40 ते 50 लाख रुपयांपर्यंत असू शकते. ही SUV 2025 पर्यंत भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना या कार साठी जास्त वेळ वाट पहावी लागेल. MAHINDRA ARMADA ही अपकमिंग एसयूव्ही  लॉन्च झाल्यानंतर टोयोटा फॉर्च्यूनर , एमजी ग्लोबस्टर या एसयूव्ही सोबत प्रतिस्पर्धा करेल.