Mahindra च्या ‘या’ गाड्यांवर मिळतोय बंपर डिस्काउंट

टाइम्स मराठी । दिवाळी निमित्त बऱ्याच वाहन निर्माता कंपन्या कारवर बंपर डिस्काउंट ऑफर देत आहेत. जेणेकरून दिवाळी निमित्त ग्राहक कमी  किमतीमध्ये वाहन खरेदी करू शकतील. याचा फायदा ग्राहक आणि  कंपनीला देखील होईल. त्यानुसार आता देशातील पॉप्युलर कार निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिंद्राने काही SUV वर जबरदस्त डिस्काउंट ऑफर उपलब्ध केली आहे.  ग्राहकांना महिंद्राची  MAHINDRA XUV 300 आणि  MAHINDRA 400 या SUV डिस्काउंट ऑफर नुसार खरेदी करता येईल. यासोबतच महिंद्राच्या ॲक्सेसरीज वर देखील डिस्काउंट देण्यात येत आहे. जर तुम्ही महिंद्रा कंपनी च्या MAHINDRA XUV 300 आणि  MAHINDRA 400 या दोन्ही कार पैकी कोणतीही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या डिस्काउंट ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

   

MAHINDRA XUV 300 ऑफर

MAHINDRA XUV 300 या एसयूव्हीच्या W8 या व्हेरिएंट वर कंपनीकडून 1.2 लाख रुपयांची सूट देण्यात येत आहे. यामध्ये 95000 रुपये कॅश डिस्काउंट,  महिंद्रा ॲक्सेसरीज वर 25000 रुपये डिस्काउंट देण्यात येत आहे. त्याचबरोबर या SUV च्या W6 व्हेरीएंट वर 80,000  रुपयांचा डिस्काउंट ग्राहकांना मिळू शकतो. त्यानुसार 55000 रुपये सूट, आणि ॲक्सेसरीज वर 25000 रुपयांची सूट देण्यात येत आहे.

स्पेसिफिकेशन

मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या  MAHINDRA XUV 300 या स्पोर्टी सब कॉम्पॅक्ट SUV मध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजन ऑप्शन उपलब्ध आहे. या SUV मध्ये 110 hp टर्बो पेट्रोल आणि 131 hp टर्बो स्फोर्ट इंजिन मिळते. या टर्बो पेट्रोल इंजिन सोबत 6 स्पीड मॅन्युअल  AMT सुसज्ज करण्यात आले आहे. आणि टर्बो स्पोर्ट इंजिन सोबत 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सुसज्ज करण्यात आले आहे. यासोबतच 117 hp डिझेल इंजिन देखील या SUV मध्ये देण्यात आले आहे. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड AMT ने जोडण्यात आले आहे.

MAHINDRA XUV400  ऑफर

MAHINDRA XUV400 या SUV वर देखील डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार या SUV चा टॉप एंड EL व्हेरियंट वर आणि  ESC च्या EL या व्हेरिएंट वर 3.5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. याशिवाय बेस स्पेक EC यावेळी 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट कंपनीकडून देण्यात येत आहे. या डिस्काउंट ऑफर नुसार तुम्ही  दिवाळीच्या या काळात ही  SUV खरेदी करण्याचा विचार करू शकतात.

MAHINDRA XUV 400 स्पेसिफिकेशन आणि बॅटरी

XUV 400 या इलेक्ट्रिक कार मध्ये देण्यात आलेल्या बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 34.5 kWh लिथियम आयन बॅटरी उपलब्ध आहे. ही बॅटरी 7.2 KW आणि 3.3 kw चार्जिंग ला सपोर्ट करते. ही बॅटरी दोन चार्जिंग ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. एवढेच नाही तर चार्जिंग ऑप्शन्सह दोन बॅटरी पॅक देखील यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यापैकी पहिली बॅटरी 39.4 kWh पावर प्रदान करते.  दुसरी बॅटरी 34.5 kWh एवढी पावर प्रदान करते. यासोबतच पहिली बॅटरी 456 किलोमीटर आणि दुसरी बॅटरी 375 किलोमीटर एवढी रेंज देते.

MAHINDRA XUV400 मल्टी ड्राईव्ह मोड

XUV400 या इलेक्ट्रिक कार मध्ये देण्यात आलेली मोटर 150 बीएसपी पावर 310 nm पिक टॉर्क जनरेट करते. ही इलेक्ट्रिक कार 150 किलोमीटर प्रति घंटा टॉप स्पीड देते. तसेच 100 किमी प्रति तास स्पीड पकडण्यासाठी या कारला 8.3 सेकंद एवढा वेळ लागतो. या इलेक्ट्रिक कार मध्ये मल्टी ड्राईव्ह मोड देण्यात आले आहे. हे मोड रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम सह थॉटल ऍडजेस्ट करण्यास मदत करतात.