Mahindra CNG Tractor : Mahindra ने सादर केला पहिला CNG ट्रॅक्टर; दर तासाला वाचतील 100 रुपये

टाइम्स मराठी । शेतकऱ्यांचा आवडता ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Mahindra कंपनीचे बरेच प्रॉडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यानुसार आता Mahindra कंपनीने पहिला CNG मोनो फ्युल ट्रॅक्टर (Mahindra CNG Tractor) सादर केला आहे . हा ट्रॅक्टर नागपूर मध्ये झालेल्या ॲग्रोव्हिजन मध्ये सादर करण्यात आला . 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या पहिल्या दिवशी महिंद्राने हा ट्रॅक्टर सादर केला. या ट्रॅक्टरमध्ये डिझेल ऐवजी CNG भरण्यात येईल. जेणेकरून प्रदूषण मोठ्या प्रमाणात टाळू शकते. या परिषदेवेळी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये हे ट्रॅक्टर सादर करण्यात आले.

   

काय म्हणाली कंपनी

या CNG ट्रॅक्टर बद्दल कंपनीने सांगितले की, या ट्रॅक्टर मध्ये (Mahindra CNG Tractor) सर्वात कमी इंधन लागेल. पण या ट्रॅक्टरचा परफॉर्मन्स हा अप्रतिम असेल. हा CNG ट्रॅक्टर महिंद्राच्या चेन्नई स्थित रिसर्च व्हॅलीमध्ये डेव्हलप करण्यात आले आहे. हा ट्रॅक्टर डिझेल मॉडेल पेक्षाही दमदार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या CNG ट्रॅक्टर मुळे इंधनाचा खर्च 70% पर्यंत कमी होईल. यामध्ये देण्यात आलेल्या इंजिनचा जास्त आवाज होत नाही. हा CNG ट्रॅक्टर आरामदायक आणि जलद गतीने काम करतो .

तासाला 100 रुपये वाचवू शकतात– Mahindra CNG Tractor

या CNG ट्रॅक्टरचा वापर शेतीसोबतच मालवाहतूक करण्यासाठी देखील होऊ शकतो. एयरपोर्ट किंवा  इतर ठिकाणी मालवाहतूक म्हणून  प्रदूषण मुक्त  ट्रॅक्टरचा वापर करता येईल. महिंद्राच्या डिझेल ट्रॅक्टर पेक्षा CNG ट्रॅक्टर हे कोणत्याच प्रकारे कमी नसल्याचे कंपनीने सांगितले. यासोबतच डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत CNG ट्रॅक्टरचा वापर करून तुम्ही दर तासाला 100 रुपये वाचवू शकता असं देखील कंपनीने सांगितलं.

4 टाक्यांचा वापर

या CNG ट्रॅक्टरमध्ये चार टाक्या वापरण्यात आल्या आहे. या चार टाक्यांपैकी एका टाकीमध्ये 45 लिटर पाणी भरण्याची क्षमता आहे. या टाक्यांमध्ये  24 किलो गॅस भरला जाऊ शकतो. हा गॅस 200 बार प्रेशरने भरला जातो. CNG ट्रॅक्टर मुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. डिझेल इंजिन असलेल्या ट्रॅक्टरपेक्षा CNG ट्रॅक्टर हा अतिशय फायदेशीर आहे.