Mahindra चा धमाका!! Bolero- Scorpio सह ‘या’ गाड्यांचं Electric व्हर्जन आणणार

टाइम्स मराठी । महिंद्रा कंपनी (Mahindra) भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. नुकतंच केपटाउन मध्ये आयोजित एका फ्युचरस्पेक इव्हेंटमध्ये महिंद्राने आगामी प्रोडक्ट्स आणि इलेक्ट्रिक गाड्यांच्या स्टेटर्जी आणि डेव्हलपमेंट बद्दल माहिती दिली. त्यानुसार, येत्या काळात सर्व ICE SUV इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली. तसेच एक्सयुव्ही XUV आणि बॉर्न इलेक्ट्रिक BE या ब्रांड च्या माध्यमातून अनेक नवीन प्रॉडक्ट कंपनी लॉन्च करणार आहे. यासोबतच कंपनी पाच टॉप सेलिंग SUV बोलेरो आणि स्कार्पिओ एन, एक्सयूव्ही 700 या ब्रांडचे मॉडेल देखील लाँच केलं जाणार आहे.

   

महिंद्राने दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा बोलेरोच्या इलेक्ट्रिक वेरियंटमध्ये इंगलो मोनोकॉक प्लॅटफॉर्म देण्यात येणार आहे. यासोबतच या इलेक्ट्रिक कारची डिझाईन ही फ्युचरिस्टिक अप्रोच मध्ये दिसेल. महिंद्रा बोलेरो सोबतच महिंद्रा स्कार्पियोच्या इलेक्ट्रिक व्हेरिएंट मध्ये ग्लोबल पिकअप दिला जाऊ शकतो. तसेच एक्सयूव्ही 700 ही इलेक्ट्रिक व्हेरियंट भारतीय बाजारामध्ये 2024 पर्यंत येऊ शकते.

पावर ट्रेन

महिंद्रा येणाऱ्या काळामध्ये लॉन्च करणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स यामध्ये म्हणजेच महिंद्रा थार, स्कार्पिओ आणि बोलेरोच्या या सर्व इलेक्ट्रिक व्हेरिएंट मध्ये पावर ट्रेन च्या माध्यमातून सिंगल किंवा ड्युअल मोटर सेटअप देणार हे. ही इलेक्ट्रिक पॉवर ट्रेन फोक्सवॅगन किंवा वैलेओ यांच्याकडून घेतली जाईल. यासोबतच या इलेक्ट्रिक व्हेरिएंट मध्ये तीन पावर ट्रेन देण्यात येतील. फ्रंट मोटर सेटअप मध्ये 110 ps आणि 135 nm आउटपुट देण्यात येईल. यासोबतच रियर मोटर सेटअप मध्ये 285 ps आणि 535 nm आउटपुट देण्यात येईल. याबाबत माहिती दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या इव्हेंट मध्ये देण्यात आली.

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये 75 वेगवेगळे साउंड-

महिंद्रा कंपनीच्या योजनेनुसार 2027 पर्यंत 25 टक्के इलेक्ट्रिक एसयूव्ही ची विक्री कंपनी करून इच्छित आहे. महिंद्रा इलेक्ट्रिक ICE SUV साठी नवीन लोगो वापरणार आहे. यासोबतच महिंद्राने कॉपर ट्विन पीक फक्त XUV400 मध्ये वापरण्यात येईल असं सांगितलं. कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये 75 वेगवेगळे साउंड वापरले आहेत. या साऊंड चा वापर कारचे दरवाजे खोलण्यापासून ते ड्रायव्हिंग मोड्स पर्यंत करता येऊ शकतो. या साऊंड्सला ऑस्कर विजेता आणि मशहूर भारतीय संगीतकार ए आर रहमान यांच्याद्वारे कंपोज करण्यात आले आहे. या साऊंडच्या माध्यमातून इलेक्ट्रिक एसयूव्ही चा अनुभव चांगल्या प्रकारे वाढवण्यात येईल.