2024 मध्ये लाँच होणार Mahindra KUV 200; देईल एवढे मायलेज

टाइम्स मराठी । Mahindra Motors कंपनी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये SUV लॉन्च करत असते. आता भारतीय बाजारपेठेमध्ये महिंद्रा मोटर्स लवकरच 5 सीटर SUV लॉन्च करणार आहे. Mahindra KUV 200 असे या SUV चे नाव आहे. सध्या तरी महिंद्रा कंपनीकडे पाच सीटर XUV मध्ये फक्त XUV 300 आहे. Mahindra KUV 200 ही अपकमिंग एसयूव्ही 2024-25 मध्ये लॉन्च होऊ शकते. याबाबत अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. आज आपण या कारचे खास फीचर्स जणूं घेऊयात.

   

मिळालेल्या माहितीनुसार Mahindra KUV 200 ही 5 सीटर एसयूव्ही वेगळी असणार आहे. यासोबतच ही एसयूव्ही एक वेगळा प्लॅटफॉर्मवर डिझाईन करण्यात येऊ शकते. एवढेच नाही तर यामध्ये बरेच आधुनिक फीचर्स देखील देण्यात येऊ शकतात. या एसयूव्हीमध्ये पेट्रोल इंजिन मिळेल. हे इंजिन अत्यंत पावरफुल इंजिन असण्याची शक्यता आहे.

फिचर्स

Mahindra KUV 200 या अपकमिंग एसयूव्ही मध्ये 10 इंच टचस्क्रीन डिस्प्ले, AC वेंस्ट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॅनोरमिक सनरुफ, व्हेंटिलेटेड सीट, मोबाईल कनेक्टिव्हिटी यासारखे फीचर्स मिळू शकतात. त्याचबरोबर यामध्ये नवीन डिझाईन देखील मिळू शकते. महिंद्रा कंपनीची ही  5 सीटर एसयूव्ही अप्रतिम मायलेज देईल.

इंजिन किती

Mahindra KUV 200 या मिनी एसयूव्हीमध्ये  1698 cc पेट्रोल इंजिन देण्यात येऊ शकते. ही एसयूव्ही 15 ते 17 km प्रति लिटर एवढे मायलेज देण्यात सक्षम असेल. या एसयूव्ही मध्ये कंपनीकडून 60 लिटर कॅपॅसिटी असलेले फ्युअल टॅंक मिळू शकते. मिळालेल्या माहितीनुसार  महिंद्रा मोटर्स ही एसयूव्ही 11.20 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीमध्ये लॉन्च करू शकते.